आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • CM Uddhav Thackeray Called An All Party Meeting Today On The Issue Of Maratha And OBC Reservation, Maharashtra MPs Met The President A Day Ago

आरक्षणाच्या मुद्द्यावर एकमत:मराठा आणि OBC आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी आज बोलावली सर्वपक्षीय बैठक, नुकतेच राष्ट्रपतींना भेटले होते राज्यातील खासदार

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्वोच्च न्यायालयाने दिली होती मराठा आरक्षणाला स्थगिती

मराठा आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षणाच्या मुद्यावर सर्व पक्षांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. याआधी 27 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोटा रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.

त्या बैठकीत चर्चा झाली की जोपर्यंत ओबीसी आरक्षण पूर्ववत होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत. ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे यावर भाजपसह सर्व पक्षांचे एकमत झाले. त्यानंतर त्यांनी सांगितले की, येत्या काही दिवसांत मीटिंगमध्ये मिळालेल्या सूचना आणि पर्यायांचा अभ्यास करून या विषयावर निर्णय घेऊ.

उद्धव ठाकरे यांनी आरक्षणावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीचे स्वागत केले. ते म्हणाले की, ओबीसी आरक्षणाच्या मागणीवर सर्व पक्षांनी एकत्र आणि एकजूट राहिले पाहिजे.

सर्वोच्च न्यायालयाने दिली होती मराठा आरक्षणाला स्थगिती
यापूर्वी 5 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या प्रकरणावर आदेश दिला होता. न्यायालयाच्या या आदेशात असे म्हटले होते की, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास लोकांना रोजगार आणि प्रवेशामध्ये आरक्षण देण्याचा अधिकार राज्यांना नाही. यासाठी न्यायाधीशांनी संविधानाच्या 102 व्या दुरुस्तीचा संदर्भ दिला. यासह महाराष्ट्रातील मराठ्यांना ओबीसीमध्ये समाविष्ट करून आरक्षण देण्याच्या निर्णयालाही सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती.

एका शिष्टमंडळाने राष्ट्रपतींचीही घेतली भेट
यापूर्वी गुरुवारी, राज्यसभेचे सदस्य संभाजीराजे छत्रपती यांच्यासह महाराष्ट्रातील चार प्रमुख पक्षांचे प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटण्यासाठी गेले होते, परंतु जे निवेदन राष्ट्रपतींना सोपवायचे होते, त्यावर स्वाक्षरी करण्यासाठी तेथे भाजप खासदारांनी गोंधळ घातला. शेवटी, राष्ट्रपतीच खासदाराला सांगावे लागले की, तुम्ही या निवेदनावर स्वाक्षरी का केली नाही. त्यानंतर भाजप खासदाराने त्यावर आपली स्वाक्षरी केली.

बातम्या आणखी आहेत...