आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त जनतेशी संवाद साधला. आज महाराष्ट्र दिन, कामगार दिन आहे, सर्वांना शुभेच्छा, आजच्या या दिनी महाराष्ट्र लढ्यासाठी योगदान दिलेल्या सर्वांची आठवण येते, असेही ते म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी 3 मे नंतर लॉकडाउनच काय याबाबत माहिती दिली.
तीन मे नंतर लॉकडाऊनचं काय? हा प्रश्न विचारला जात आहे. त्याबाबत योग्य ते निर्णय घेण्यात येईल. अर्थचक्र रुतलं मान्य, पण तुम्ही सगळे जवान राज्याची संपत्ती आहात. जनता ही राज्य आणि देशाची संपत्ती आहे. मुंबई आणि परिसर, पुणे आणि आसपासचा भाग, नागपूर, औरंगाबाद हे रेड झोन आहेत. रेड झोनमध्ये कडक नियम पाळावे लागतील. ग्रीन-झोनमधील अटी-शर्थी कमी करत आहोत. पण नियमांचे पालन करा. अन्यथा नियम पुन्हा कडक करावे लागतील. असेही मुख्यमंत्री म्हणाले.
शेती-शेतकऱ्यांवर कोणतंही बंधन नाही. बी बियाणे, शेती जशी चालू आहे, तशीच चालू राहील. मालवाहतूक सुरु केली आहे. हळूहळू बंधनं उठवत आहोत. पण झुंबड झाली तर पुन्हा बंधनं टाकावी लागेल. तीन तारखेनंतर आपण आतापेक्षा अधिक मोकळीक देणार आहोत, पण गर्दी नको, अन्यथा पुन्हा बंधनं टाकावी लागतील, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
काय म्हणाले उद्धव ठाकरे
> हीरक महोत्सवी महाराष्ट्र दिन धुमधडाक्यात साजरा करायचा असे आधी ठरवलं होतं, पण आता नाईलाज आहे. मी आजही तोंडावर मास्क लावून अभिवादन केले.
> लतादीदींनी 2010 मध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षी बीकेसीतील मैदानात ‘बहु असोत सुंदर’ गायल्याची आठवण जागी, आज त्याच जागी कोविड रुग्णांसाठी उपचार केंद्र सुरु केले, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
> संयुक्त महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षी गोरेगावमध्ये रक्तदान शिबीर घेतलं होतं, आज त्याच जागी अनेक रुग्णशय्या तयार आहेत.
> लॉकडाऊन म्हणजे टाळेबंदी नाही, तर गतिरोधक आहे. सिंगापूरच्या पंतप्रधानांनी लॉकडाऊनसाठी सर्किट ब्रेकर शब्द वापरला. कोरोनाची साखळी रोखण्यासाठी लॉकडाउनचा उपयोग केला. यात महाराष्ट्राच्या जनतेने मोठी साथ दिली. आपण कोरोनाची साखळी तोडली नसती तर आकडा कितीतरी वाढला असता, असे मुख्यमंत्री म्हणाले.
> हिंगोलीमध्ये पोलिस जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. पण सर्व जणांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. अद्यापही 75 ते 80 टक्के रुग्ण सौम्य, अतिसौम्य लक्षणं असलेले आहेत. काळजी घेतली नाही, तर ते कोरोनाचे वाहक ठरण्याची भीती आहे.
> ऑक्सिमीटरच्या मदतीने दोन लाख तपासण्या करण्यात आल्या. यांमध्ये 272 जणांमध्ये ऑक्सिजन मात्रा कमी किंवा इतर व्याधी असलेले सापडले लोक सापडले.
> मुंबई आणि कल्याण डोंबिवलीच्या महापौरांनी पुन्हा परिचारिका म्हणून काम करण्याची तयारी दाखवली आहे. कोरोनाशी लढण्यासाठी वीस हजार कोविड योद्धे तयार आहेत. त्यापैकी दहा हजार योद्ध्यांना प्रशिक्षण देत आहोत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
> लक्षणे आढळली तर लगेच उपचार करा. कोरोना झाला म्हणजे सगळं संपलं असं नाही. कोरोनाचा रुग्ण लवकर आला तर तो लवकर बरा होऊ शकतो. 6 महिन्यांच्या बाळापासून ते आजीबाईंच्या वयापर्यंत रुग्ण बरे झालेत.
> इतर राज्यात अडकलेल्या लोकांना परत आणायचं आहे. परराज्यातील मजूर, पर्यटक यांना ने-आण करण्याची व्यवस्था करत आहोत. तसेच परराज्यात जाण्यासाठी लोकांनी गर्दी करू नका.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.