आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन:शिकाऊ वाहनचालक परवाना, वाहन नोंदणी आता वितरकांमार्फत होणार; चारचाकी-दुचाकींची नोंदणीही ऑनलाइन होणार

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विभागाकडून आजवर ८५ सेवा ऑनलाइन - अनिल परब

शिकाऊ वाहनचालक परवाना आणि नवीन खासगी दुचाकी व चारचाकी वाहनांची नोंदणी वितरकांमार्फत ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून देऊन परिवहन विभागाने सोमवारी जनहिताचे एक महत्त्वाकांक्षी पाऊल टाकले असून भविष्यातही शासकीय विभागांना ज्या सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देणे शक्य आहे त्या उपलब्ध करून देण्यासाठी ई-गव्हर्नन्सवर आधारित नवीन कार्यपद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

“सारथी ४.०’ या अद्ययावत प्रणालीअंतर्गत आधार क्रमांकांशी संलग्न असलेल्या ऑनलाइन शिकाऊ वाहन चालक परवाना तसेच वाहन नोंदणीच्या ऑनलाइन प्रणालीचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमास परिवहनमंत्री अनिल परब, एनआयसी, नवी दिल्लीच्या महासंचालक डॉ. नीता वर्मा, मुख्यमंत्र्यांचे तसेच परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, परिवहन उपायुक्त जितेंद्र पाटील यांच्यासह राज्यातील परिवहन विभागाचे अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

विभागाकडून आजवर ८५ सेवा ऑनलाइन - अनिल परब
विभागामार्फत आतापर्यंत जनहिताच्या ८५ सेवा ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून दिल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. वाहन वितरकांमार्फत सर्व कागदपत्रे डीएससी (डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट) चा उपयोग करून ई-स्वाक्षरी पद्धतीने तयार करण्यात येतील.

खर्चात बचत, कामाचा ताणही कमी
राज्यात दरवर्षी सुमारे १५ लाखापेक्षा जास्त शिकाऊ परवाने देण्यात येतात. २० लाखांहून अधिक नवीन वाहनांची नोंदणी होते. यासाठी नागरिकांचा अंदाजे १०० कोटी रुपयांचा खर्च होतो. तसेच हे काम करणाऱ्या अंदाजे २०० अधिकाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...