आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपविरोधात शिवसेनेची हनुमान उडी:तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांना उद्धव ठाकरे लवकरच भेटण्याची शक्यता

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून शिवसेना आणि भाजपमधील वाद शिगेला पोहोचला आहे. अशातच आता शिवसेनेकडून राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधी मोट बांधण्याच्या हालचाली सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांची भेट घेणार आहेत.

फोनवर झालेल्या चर्चेवेळी ठाकरे यांनी केसीआर यांना २० फेब्रुवारीला मुंबईत येण्याचे निमंत्रण दिले आहे. ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांकडून माझ्या कुटुंबीयांना आणि निकटवर्तीयांना लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी नुकताच केला होता. राऊत यांच्या पत्रकार परिषदेच्या दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी केसीआर यांना फोन लावल्याने अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. केसीआर हे लवकरच मोदी सरकारविरोधात आंदोलन पुकारणार आहेत. त्यामुळे आता या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे नवी राजकीय समीकरणे आकाराला येणार का, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत.

राज्यांच्या अधिकारांवर गदा ?
आम्ही गेल्या महिनाभरापासून काम करत आहोत आणि २०२४ च्या निवडणुका एकत्र लढण्यासाठी सर्व विरोधकांची स्वतंत्र आघाडी तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले होते. केंद्रातील भाजपचे वर्तमान सरकार हे पूर्वीच्या काँग्रेस सरकारप्रमाणेच वागत आहे. भाजप सरकार हे राज्यांच्या अधिकारांवर गदा आणत आहे. देशासाठी एक नवीन राज्यघटना, नवीन राजकीय शक्ती आणि नवीन शासनाची संकल्पना, मुख्यमंत्री केसीआर राव यांनी मांडली. भाजपला मुळापासून उपटून फेकायचे आहे, असे केसीआर यांनी म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...