आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा आज मुंबईच्या MMRDA मैदान, BKC, वांद्रे पूर्व येथे जाहीर सभा होणार आहे. आजच्या सभेत मुख्यमंत्री कोणावर टीकास्त्र करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान या सभेला उपस्थित राहण्यासाठी राज्याच्या विविध भागातून शिवसेना कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. भोंगा. हनुमान चालिसा, हिंदुत्व, आणि भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यांवर बोलण्यासाठी उद्धव ठाकरे आता सज्ज झाले आहेत. एक ना अनेक मुद्द्यांवरुन गेले काही दिवस राज्याचे राजकारण चांगलेच तापलेले आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भोंग्यांचा मुद्दा घेत शिवसेनेच्या हिंदुत्व आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधत आहे. यावर आज उद्धव ठाकरे काय बोलतील याकडे लक्ष लागून आहे.
आज होणाऱ्या मुख्यंत्री ठाकरे यांच्या सभेसाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता असून, परिसरातीस वाहतूक अन्य रस्त्याने वळवण्यात आली आहे.
वाहतुकीसाठी बंद असलेले मार्ग
पर्यायी रस्ते
1 : भारत नगर जंक्शनपासून वाहनांची वाहतूक पुढील अशी असेल: सेबी जंक्शनवरुन उजवीकडे वळण घेऊन वन बीकेसी जंक्शनवरून उजवे वळण घ्यायाचे आहे. त्यानंतर कॅनरा बँकेपासून डावीकडे एमसीए क्लब जंक्शन कडे जावे लागेल. तेथून अमेरिकन कॉन्सुलेट जंक्शन-टाटा, संप्रेषण डावीकडे वळून MTNL जंक्शनवरून कुर्ल्याकडे जाईल. 2 : भारत नगर जंक्शनपासून वाहनांची वाहतूक : सेबी जंक्शनवरुन उजवे वळण घेऊन नंतर वन बीकेसी जंक्शनपासून उजवे वळण घ्यावे लागेल. नंतर कॅनरा बँक जंक्शनपासून डावीकडे MCA क्लबकडे वळा. अमेरिकन कॉन्सुलेट जंक्शन-टाटा कम्युनिकेशन डावीकडे वळण- येथून MTNL जंक्शन-रज्जाक जंक्शन-मुंबई विद्यापीठ-हंस भुग्रा जंक्शन डावीकडे वळण. पश्चिम द्रुतगती महामार्गावरून पुढे जावून खेरवाडी सरकार कॉलनी- खेरवाडी वांद्रे पूर्व मुंबई.
3 : MTNL जंक्शन ते टाटा कम्युनिकेशन, उजवे वळण घेऊन अमेरिकन कॉन्सुलेट जंक्शन- MCA क्लब-कॅनरा बँक जंक्शन-NSC जंक्शन डावीकडे वळण, पश्चिमेकडे एक्सप्रेस हायवे, धारावी आणि वरळी सी लिंक रोडला जावे लागेल. ही वाहतूक उद्या म्हणजे 14 रोजीसाठी असेल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.