आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेट नाकारली!:खासदार भावना गवळी यांना मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारली! ‘वर्षा’ निवासस्थानी दोन तास थांबून परतल्या शिवसेना खासदार

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • खा. भावना गवळींचे निकटवर्तीय सईद खान यांना ईडीने नुकतीच अटक केली.

मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीचा ससेमिरा मागे लागलेल्या शिवसेनेच्या यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी यांना मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी भेट नाकारली. गवळी या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दोन तास थांबल्या, मात्र त्यांना उद्धव यांनी भेट दिली नाही.

खा. भावना गवळींचे निकटवर्तीय सईद खान यांना ईडीने नुकतीच अटक केली. खासदार गवळींच्या बालाजी पार्टिकल बोर्ड कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात ईडीने पाच संस्थांवर छापे टाकले होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गवळींच्या चौकशीची मागणीही केली होती. तेव्हापासून गवळी रडारवर असून ईडीकडून त्यांच्यावरील आरोपांची शहानिशा केली जात आहे.

ईडीचा ससेमिरा लागताच मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतून उतरल्या?
पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी खासदार भावना गवळी शुक्रवारी वर्षा निवासस्थानी दुपारी १२ वाजता पोचल्या. मुख्यमंत्री बैठकीत होते. अडीच वाजेपर्यंत गवळींनी वाट पाहिली. शेवटी त्यांना आज साहेब भेटणार नाहीत, असे सांगण्यात आले. त्यानंतर त्या वर्षा येथून बाहेर पडल्या. मनी लाँड्रिंग प्रकरणात सापडल्याने त्या मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतून उतरल्या असल्याचे संकेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...