आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना संकट:राज्यातील पोलिसांना विश्रांती देण्यासाठी प्रसंगी केंद्राकडून मनुष्यबळ मागवू : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • मुंबई लष्कराच्या ताब्यात देणार ही तर केवळ अफवाच - मुख्यमंत्री

गेल्या अनेक दिवसांपासून पोलिस तहानभूक विसरून, आपल्या घराबाहेर राहून कर्तव्य बजावत आहेत. आता राज्यातील हे पोलिस तणावाखाली असल्याने त्यांना विश्रांती देणे आवश्यक आहे. यासाठी आणखी मनुष्यबळ राज्यात लागणार आहे. केंद्राकडे त्याची मागणी करू. परंतु याचा अर्थ असा नव्हे की, आपण मुंबई लष्कराच्या ताब्यात देणार आहोत. ही एक अफवाच आहे, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यातील जनतेला संबोधित करताना दिले.

मुख्यमंत्री म्हणाले, करमाड येथे घडलेली दुर्घटना दुर्दैवी आहे. मजुरांच्या स्थलांतराबाबत इतर राज्यांशी चर्चा सुरू आहे. मजुरांनी कुठेही जाऊ नये. संयम राखावा, अन्यथा सर्व ठप्प होईल. केंद्राशी समन्वय साधून स्थलांतराचा प्रश्न मिटवण्याचा राज्य सरकारकडून कसून प्रयत्न सुरू आहे. इतर राज्यांसाठीही रेल्वे सुरू करून केंद्र सरकार, आपले राज्य आणि ज्या राज्यात त्या मजुरांना जायचे आहे तेथील सरकारसोबत बोलणी करून मजुरांना पाठवण्यात येत आहे. आपल्या घरी जायला निघालेल्या या मजुरांची राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी जेवण्याची सोय केली आहे. सोबत डॉक्टरही दिलेला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...