आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदारांसाठी कार्यशाळा:'अर्थसंकल्प ही ठिपक्यांची रांगोळी, ठिपके माझ्या महाराष्ट्रातील मतदारसंघ, ते जोडले गेले तर माझे राज्य जोडले जाणार आहे' - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • खोटे बोलून त्यांना खोटा धीर मी कधीच देणार नाही. मग माझ्यावर किती टीका झाली तरी चालेल

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे आमदारांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ‘राज्याचा अर्थसंकल्प : माझ्या मतदार संघाच्या संदर्भात…’अशी ती कार्यशाळा होती. यावेळी सर्व आमदारांना संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. यामध्ये त्यांनी अर्थसंकल्पाबाबत आपले मत व्यक्त केले आहे. अर्थसंकल्प म्हणजे ठिपक्यांची रांगोळी असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमदारांना संबोधित करताना म्हणाले की, 'दिवाळी आली की, मला माझे बालपण आठवते. तेव्हा छान मातीने सारवायचे. त्यावर ठिपक्यांची रांगोळी काढायची. अर्थसंकल्प देखील ठिपक्यांची रांगोळीच आहे. आपण जेव्हा तो कागद ठेवतो आणि त्या ठिपक्या आखल्या जातात, हा अर्थसंकल्प आहे. मात्र ते आखलेले ठिपके माझ्या महाराष्ट्रातील मतदारसंघ आहेत. हे मतदारसंघ एकत्र जोडले गेले आणि त्याच्यामध्ये आपण रंग भरले तेव्हाच त्या रांगोळीला अर्थ येतो. रांगोळीतील ठिपके जोडायचे काम काम निवडून आलेल्या आमदारांनी करायचे आहे. कारण ठिपका जोडला गेला तर माझे राज्य जोडले जाणार आहे'

भागृहात कसे बोलावे? हे आपण शिकायला हवे
अर्थसंकल्पाविषयी बोलताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, 'अर्थसंकल्प हा विकासाचे चित्र दाखवत असतो. तो कसा मांडावा, कसा बनवतात हे जास्त महत्त्वाचे आहे. मी सभागृहात जेव्हा पाऊल ठेवले तेव्हा मला सभागृहाचा काहीच अनुभव नव्हता. एवढेच काय तर या विभागात माझे येणे-जाणे देखील नव्हते. सभागृहात आल्यानंतर मी येथील वातावरण पाहिले. यामध्ये दोन भाग दिसले एक सत्तारुढ पक्ष, एक विरोधी पक्ष. विरोधी पक्ष नेमका कुणाचा, आणि कशाचा विरोध? सभागृहात कसे बोलावे? हे आपण शिकायला हवे.

कितीही टीका झाली तरी चालेल, पण...
यानेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील परिस्थितीवर देखील भाष्य केले आहे. ते म्हणाले की, 'गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहत आहोत की आपल्याकडे चक्रीवादळाने पावसाची सुरुवात होत आहे. प्रत्येकवेळी नुकसान होतेय. मग पंचनामे होतात. नुकसानभरपाई कशी होते? यावेळी तात्काळ मदत देखील करावे लागते. मात्र जनतेसमोर खोटे बोलून त्यांना खोटा धीर मी कधीच देणार नाही. मग माझ्यावर किती टीका झाली तरी चालेल' असे देखील मुख्यमंत्री म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...