आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • CM Uddhav Thackeray's Birthday: Ajit Pawar Shares The Photo Holding The Steering Of The Car, CM Is Sitting On The Side; People Asked What Is The Purpose

उद्धव ठाकरेंचा वाढदिवस:अजित पवारांनी कारचा स्टेअरिंग पकडलेला फोटो शेअर केला, मुख्यमंत्री बसलेत बाजूला; लोकांनी विचारले - काय उद्देश आहे?

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या फोटोत दोन्ही एका ओपन कारमध्ये बसले आहेत आणि अजित पवारांनी स्टेअरिंग सांभाळले आहे
  • लोक या फोटोबद्दल प्रश्न उपस्थित करीत आहेत

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज 60 वा वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्धव यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत दोघेही एका गाडीत बसले असून गाडीचे स्टेअरिंग अजित पवारांच्या हातात आहे.

अजित पवारांनी शुभेच्छा देत या फोटो सोबत ट्विटरवर लिहिले की, "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. दीर्घायु आणि आरोग्यदायी राहा."

लोक फोटोबद्दल प्रश्न उपस्थित करीत आहेत

हा फोटो यावर्षी पुण्यात झालेल्या कृषी प्रदर्शनाचा आहे, दोघांनीही एकाच कारमध्ये संपूर्ण प्रदर्शनाला भेट दिली. दरम्यान लोक या फोटोचा दुसरा अर्थ काढत आहेत. मुख्यमंत्र्यांना शेजारी बसवून अजितदादांनी स्टेअरिंग हातात का घेतला असा प्रश्न काहींनी उपस्थित केला आहे.

सतीश नावाच्या व्यक्तीने ट्विटरवर या फोटोबद्दल विचारले...

व्यंगचित्रकार विनय चाणेकर यांनी लिहिले, "दादा स्टेअरिंग (संचालन) आपल्या हातात घ्या, महाराष्ट्राला गती द्या."

पंतप्रधान मोदींनीही दिल्या शुभेच्छा

पंतप्रधान मोदींनी उद्धव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना केली. पीएम यांनी ठाकरे यांना शुभेच्छा देत म्हटले की, "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी त्यांच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करतो."