आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला:'उद्धवजींमध्ये आम्हाला आता राहुलजी स्पष्टपणे दिसत आहे, यात कोणत्याही प्रकारे शंका नाही'; दसरा मेळाव्यानंतर राणेंची प्रतिक्रिया

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवारी मुंबईत शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. त्यात शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला. 'आमचा आवाज कोणी दाबू शकत नाही. आमचा आवाज दाबवणारा कधीच जन्माला येऊ शकत नाही.' अशा शब्दात ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून विरोधकांवर हल्लाबोल केला.

'काही जण केवळ माझे भाषण संपण्याची वाट पाहत आहे. भाषण कधी थांबते आणि कधी एकदा चिरकतोय, अशी काही जणांची अवस्था आहे. कारण शिवसेना आणि ठाकरे कुटुंबावर टीका करणे, चिरकणे यातूनच त्यांना रोजगार प्राप्त होतो' असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला. त्यावर आता भाजपचे नेते नितेश राणे यांनी भाष्य करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र केले आहे.

राणे यांनी ट्विट करत सांगितले आहे की, 'शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर मी आता आत्मविश्वासाने सांगू शकतो की, मला आता उद्धवजींमध्येच राहुलजी एकदम स्पष्टपणे दिसत आहे. यात कोणत्याही प्रकारे शंका नाही.' असे ट्विट करत राणे यांनी ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे.

दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विधान

'कोणी अंगावर आले, तर आम्ही शिंगावर घेऊ हे आव्हान मी माझ्या शिवसैनिकांच्या जीवावर देतो. पोलीस आणि प्रशासनाच्या जीवावर हे आव्हान देत नाही. तुम्हाला जर अंगावर यायचेच असेल तर स्वत:च्या जीवावर आव्हानं द्या. सीबीआय, ईडी यांच्या जीवावर आम्हाला आव्हान देऊ नका. आव्हान द्यायचे आणि मग पोलीसांच्या पोलीसांच्या मागे लपायचे याला हिंदुत्व म्हणत नाही. त्याला नामर्दपणा म्हणतात. असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी विरोदकांवर निशाणा साधला होता.

हिंमत असेल तर पाडून दाखवा

'तुम्हा सर्वाच्या आशिर्वादाने पुढील काही महिन्यातच महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पुर्ण होणार आहे. सरकार पाडण्याचे अनेकांनी स्वप्न बघितले. त्यासाठी प्रयत्न देखील करण्यात आले. मात्र हिंमत असेल तर महाविकास आघाडी सरकारला पाडून दाखवा.

देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरु झाला असून, बंगाली जनतेने जो धडा शिकवला त्या बंगाली जनतेचे आणि ममता दीदींचे मी अभिनंदन करतो. न झुकण्याची जिद्द आपल्या रगारगात कायम ठेवावी लागेल. हर हर महादेव हे दिल्लीच्या तख्याला दाखवण्याची वेळ येऊ नये मात्र आली तर, आपली ती आपल्याला दाखवावीच लागेल.' असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...