आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरेंचा फडणवीसांना टोला:'मी तर पाकिस्तानमध्ये बाँब फुटण्याची वाट पाहत आहे', मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांना प्रतिउत्तर

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आर्यन प्रकरणावरून राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक एनसीबी आणि भाजपवर टीका करतांना पाहायला मिळत आहे. मलिक यांनी आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आपले मत मांडत म्हटले होते की, मलिकांनी दिवाळीपुर्वी लवंगी फटाका फोडला आहे, मी मात्र दिवाळीनंतर मोठा बाँब फोडणार आहे. असे फडणवीसांनी म्हटले होते.

त्यावर आता या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सक्रिय झालेले पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना उत्तर देत म्हटले आहे की, 'मी तर पाकिस्तानमध्ये बाँब फुटायची वाट पाहतोय' असा टोला ठाकरे यांनी फडणवीसांना लगावला आहे. वर्षा या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुढे ठाकरे यांनी आपल्या कामकाजाबद्दल भाष्य केले. ते म्हणाले की, 'गेल्या काही दिवसांत लसीकरणाचे प्रमाण मंदावले आहे. नागरिक लसीकरणासाठी कमी प्रमाणात येत आहेत, त्यांना पकडून आणू शकत नाही. तर, कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही, हे कोणीच सांगू शकत नाही.

मंत्रालय हे कार्यालय आहे नक्कीच जायला पाहिजे, पण गेलो नाही म्हणून कामे झाले नाहीत असे झाले नाही? मंत्रालयात जातो येतो, पाट्या टाकतो याला काही अर्थ नाही. वर्षा बंगल्यात कार्यालय आहे, इथून काम सुरू आहे. इतकी वर्षे जे मंत्रालयात जात होते त्यांनी जे काय केले ते मला निस्तरायचे आहे' असे उद्धव ठाकरे म्हणाले.

काय म्हणाले होते फडणवीस
रिव्हर मार्चच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला विनंती केल्यानंतर आम्ही त्या मोहिमेशी जोडले गेलो होतो. मी त्यांना मदत करत होतो. त्या गाण्याच्या शूटिंगच्या वेळी हे फोटो काढण्यात आले आहेत. ते चार वर्षांपुर्वीचे आहे. नवाब मलिकांनी जाणीवपूर्वक माझ्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केला याच्या पाठीमागची मानसिकता दिसत आहे. रिव्हर मार्चने स्पष्ट केले आहे की तो भाड्याने आणलेला माणूस आहे. त्यामुळे त्यांचा आणि आमचा काहीही संबंध नाही. असे फडणवीस म्हणाले होते.

बातम्या आणखी आहेत...