आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:महाराष्ट्रात महिलांकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होता कामा नये, यूपीतील घटनेवर मुख्यमंत्र्यांचा इशारा

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उत्तर प्रदेशमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या ज्या घटना घडल्या त्या दुर्दैवी

महाराष्ट्रात महिलांकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होता कामा नये, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराचे तीव्र पडसाद देशभरात उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया केली.

मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाचा डिजिटल उद्घाटन सोहळा आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. त्या वेळी त्यांनी जनतेशी संवाद साधताना उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या घटनांवर भाष्य केले. तसेच महाराष्ट्रात हे सहन केले जाणार नाही, असा इशाराही दिला. उत्तर प्रदेशमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या ज्या घटना घडल्या त्या दुर्दैवी आहेत. महाराष्ट्रात हे सहन होणार नाही. माझ्या माता-भगिनींकडे अत्याचार करण्याचे तर सोडाच, पण वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होता कामा नये, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मला नेहमी दरारा आणि दहशत याबद्दल सांगायचे. पोलिसांचा असतो तो दरारा आणि गुंडांची असते ती दहशत. ही दहशत मोडून काढा. गुंडागर्दी चालू असेल तर ही दहशत मोडून काढली पाहिजे, त्या गुंडांसाठी पोलिसांचा दरारा पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...