आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाविकास आघाडी सरकारमध्ये तणाव वाढणार:मुख्यमंत्र्यांकडून सोशल मीडियावर उस्मानाबादचा उल्लेख 'धाराशिव'; काँग्रेसचा आहे विरोध

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्यमंत्री कार्यालयाची हीच ती पोस्ट. - Divya Marathi
मुख्यमंत्री कार्यालयाची हीच ती पोस्ट.
  • याआधी मुख्यमंत्री कार्यालय हँडलवर औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला होता

औरंगाबाद शहराचे ‘संभाजीनगर’ असे नामकरण करण्याचा वाद पेटलेला मिटलेला असताना त्यात आता नव्या वादाची भर पडली आहे. बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर उस्मानाबादचा उल्लेख ‘धाराशिव’ करण्यात आला. यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील तणाव वाढणार आहे.

धाराशिव -उस्मानाबाद येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्याची घोषणा यात आहे. काँग्रेसने याआधीच शहरांच्या नामांतराला विरोध केला आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर झाले असल्याचे स्पष्ट केले आहे. मंत्रिमंडळ बैठकीच्या निर्णयाची माहिती देताना मुख्यमंत्री कार्यालय हँडलवर औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला होता. त्यावरून महाविकास आघाडीत वादळ उठले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या अशा प्रकारे शहरांच्या नामांतराला विरोध असल्याचे स्पष्ट केले होते.

छत्रपती संभाजी महाराज आमचेही आराध्य दैवत आहेत. पण नामांतराने शहरांच्या, गरिबांच्या समस्या सुटतात का, असा सवाल त्यांनी केला होता. अजित पवार यांनीदेखील असे विषय आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीतच सोडवण्यात येतील, असे स्पष्ट केले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser