आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपास:कॉ. पानसरे हत्येचा तपास एटीएसकडे जाण्याची शक्यता

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुरोगामी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास दहशतवाद प्रतिबंधक पथकाकडे (एटीएस) जाण्याची शक्यता आहे. हा तपास एटीएसकडे देण्यास हरकत नसल्याचे राज्य गुन्हे शाखेने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयास सांगितले.

फेब्रुवारी २०१५ मध्ये पानसरे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्याचा सीआयडीच्या विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) याचा तपास सुरू होता. परंतु सात वर्षांनंतरही एसआयटीच्या तपासात विशेष प्रगती झाली नसल्याने पानसरे कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

बातम्या आणखी आहेत...