आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई विमानतळावर दोन महिलांना अटक:बूट, पर्समध्ये दडवले होते 2.8 किलो कोकेन; बाजारात किंमत 20 कोटी रुपये

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) रविवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन आफ्रिकन महिलांना अटक केली आणि त्यांच्या ताब्यातून २० कोटी रुपये किमतीचे २.८ किलो कोकेन जप्त केले. या महिलांनी बुटांची जोडी आणि पर्समध्ये हे कोकेन दडवले होते. एनसीबीच्या एका अधिकाऱ्यानुसार, गोपनीय माहिती मिळाल्यानंतर एनसीबीच्या मुंबई विभागीय शाखेने रविवारी विमानतळावर सापळा रचला आणि इथिओपियाच्या अदिस अबाबा येथून आलेल्या मिरांडा एस. नावाच्या दक्षिण आफ्रिकेच्या महिलेला रोखले. तिच्या झडतीत २.८ किलो कोकेन जप्त करण्यात आले. हे कोकेन बुटांच्या जोडीत आणि दोन पर्समध्ये तयार केलेल्या पोकळीत आठ पॅकेट्समध्ये दडवण्यात आले होते. अंधेरीतील एका हॉटेलमधील व्यक्तीकडे हे कोकेन पोहोचवायचे होते, असे तिने सांगितले. एनसीबीचे पथक त्वरित हॉटेलमध्ये पोहोचले. काही वेळाने तिथे एच. मुसा ही नायजेरियन महिला तिथे आली. संशयास्पद हालचाली वाटल्याने पथकाने तिला ताब्यात घेतले. आपल्याला हे कोकेन मिळणार होते, अशी कबुली तिने दिली. या दोघी आंतरराष्ट्रीय टोळीतील असल्याचे स्पष्ट झाले.

बातम्या आणखी आहेत...