आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील महाविद्यालयं सुरु होणार:उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आज दुपारी 2 वाजता करणार कुलगुरूंसोबत चर्चा

मुंबई6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या घोषणेनंतर मंगळवारपासून पुण्यात महाविद्यालये सुरु झाली आहेत. मात्र पुणे वगळता राज्यातील इतर शहरात कॉलेज सुरु झालेले नाहीत. त्यामुळे पुण्याप्रमाणे राज्यातील संपुर्ण शहरात कॉलेज सुरु करण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली होती. त्यावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आज दुपारी 2 वाजता राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत व्हिडीओ कॉन्फरंसिंग द्वारे संवाद साधणार आहे.

यात राज्यातील कॉलेज दिवाळी आधी सुरु करायची की, दिवाळीनंतर तसेच वस्तीगृह सुरु करण्याबाबतही चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर महाविद्यालय सुरु करण्यासंबंधी गाईडलाईन्स जारी केले जाणार आहे. उच्च तंत्र शिक्षण मंत्री आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन विभागाशी चर्चा करून महाविद्यालय सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशीसुद्धा चर्चा करतील आणि त्यानंतर महाविद्यालय दिवाळीनंतर नेमकी कधी सुरु करायचे याबाबत निर्णय घेतला जाईल. येत्या दोनच दिवसात राज्यातील महाविद्यालय सुरु करण्याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे. अशी माहिती स्वत: सामंत यांनी दिली आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतरच पुण्यातील स्वायत्त महाविद्यालय सुरु करण्यात आली आहे.

दरम्यान, देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून राज्यातील शाळा तसेच महाविद्यालय बंद करण्यात आली होती. आता कोरोनाता संभाव्य धोका कमी झाल्याने तसेच लसीकरणाचा टप्पा मोठ्या प्रमाणात पार पडल्याने पुन्हा आता पुर्वीप्रमाणे शाळा, महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकार घेतांना दिसत आहे.

बातम्या आणखी आहेत...