आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगाव बॉम्बस्फोट खटला:कर्नल पुरोहित कर्तव्य बजावत होते, मग बॉम्बस्फोट का रोखला नाही : हायकोर्ट

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून वगळण्यात यावे, अशी मागणी करणारा लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितचा अर्ज मुंबई हायकोर्टाने फेटाळला. फौजदारी गुन्हे प्रक्रियेनुसार खटला चालवण्यासाठी मंजुरी घेतली नसल्याचा युक्तिवाद पुरोहित याने केला होता तो न्यायालयाने मान्य केला नाही. कर्नल पुरोहित कर्तव्य बजावत होते, तर मग बॉम्बस्फोट रोखला का नाही, असा सवाल कोर्टाने केला आहे.

२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगाव येथील मशिदीनजीक बॉम्बस्फोट झाला होता. स्फोटके एका दुचाकीला गंुडाळून ती मशिदीनजीक उभी केली होती. या स्फोटात ६ जण ठार तर शंभरावर लोक जखमी झाले होते. बॉम्बस्फोटाचा कट आखल्याच्या आरोपावरून कर्नल प्रसाद पुरोहित, भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूरसह ६ जणांना अटक करण्यात आली होती. स्फोटके गुंडाळलेली दुचाकीची नोंदणी साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या नावावर होती. या स्फोटाचा तपास नंतर एनआयएकडे सोपवण्यात आला. पुरोहितच्या अर्जावर सोमवारी न्यायमूर्ती ए.एस.गडकरी व न्या.प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्या वेळी कर्नल पुरोहित कर्तव्य बजावत होते, त्यामुळे फौजदारी गुन्हे प्रक्रियेनुसार खटला चालवण्यासाठी रीतसर मंजुरी घेतली नसल्याचा युक्तिवाद केला. परंतु पुरोहित त्या वेळी लष्कराच्या सेवेत नसल्याने मंजुरीची गरज नव्हती, असे स्पष्ट करून खंडपीठाने अर्ज फेटाळला.

15 वर्षे
284 साक्षीदार
29 फितूर

भिनव भारत संघटनेवर संशय : मालेगाव स्फोटामागे अभिनव भारत संघटनेचा हात असल्याचा संशय आहे. स्फोटाआधी अभिनव भारतच्या अनेक बैठका झाल्या. या बैठकांना पुरोहित हजर होता, असा आरोप आहे.

बातम्या आणखी आहेत...