आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्रीम कोर्टाचा निकाल:आ. सोनवणे यांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध

चोपडा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोपडा मतदारसंघाच्या शिंदे गटाच्या आमदार लताबाई सोनवणे यांच्या जात वैधता प्रमाणपत्रबाबत उच्च न्यायालयाने दिलेला निकाल सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला. त्यांचे टोकरे कोळी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र सुप्रीम कोर्टाने अवैध ठरवल्यामुळे त्यांची आमदारकी धोक्यात आली आहे, अशी माहिती चोपड्याचे माजी आमदार व याचिकाकर्ते जगदीशचंद्र वळवी यांनी दिली.

९ रोजी जातवैधता प्रमाणपत्र प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय घटनापीठाचे सदस्य न्या. के. एम. जोसेफ व न्या. ऋषीकेश रॉय यांनी हा निकाल दिला. दरम्यान जातवैधता प्रमाणपत्र प्रकरणात उच्च न्यायालयाने आ. सोनवणे यांची याचिका फेटाळून लावली होती. याप्रकरणी सोनवणे यांच्याविरोधात लताबाई सोनवणे चोपडा विधानसभा मतदारसंघातून अनुसूचित जमाती या प्रवर्गातून निवडून आल्यानंतर पराभूत झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार जगदीशचंद्र वळवी व नंदुरबारचे अर्जुनसिंग दिवाणसिंग वसावे यांनी औरंगाबाद खंडपीठाकडे केल्यानंतर नंदुरबार येथील जातपडताळणी समितीला चौकशीचे आदेश दिले होते. जात वैधता प्रमाणपत्रबाबत हायकोर्टाने दिलेला निकाल सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला.

बातम्या आणखी आहेत...