आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ड्रग्स प्रकरणात अडकली कॉमेडियन:भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचियाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीनावर उद्या सुनावणी

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ड्रग्सप्रकरणी भारतीला होऊ शकतो सहा महिन्यांचा तुरुंगवास

ड्रग्स प्रकरणात अटकेत असलेली कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचियाला नारकोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सब्सटेंसेज (NDPS) कोर्टाने 4 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. दोघांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होईल.

NCB ने भारतीची ज्यूडिशियल कस्टडी आणि हर्षच्या रिमांडची मागणी केली होती. पण, कोर्टाने दोघांना न्यायालयीन कोठडीत पाठवले. याप्रकरणी शुक्रवारी अटक केलेल्या 2 ड्रग पेडलर्सला कोर्टाने 25 नोव्हेंबरपर्यत NCB च्या रिमांडमध्ये पाठवले आहे.

हर्षविरोधात ड्रग्स फायनांस-ट्रांसपोर्टेशनची कलमं

NCB ने 18 तासांच्या चौकशीनंतर रविवारी सकाळी हर्षला अटक केले होते. त्याच्यावर नारकोटिक्स अॅक्ट-1986 ची कलम 27A लावण्यात आली. म्हणजेच, ड्रग्सचा फायनांस आणि ट्रांस्पोर्टेशनच्या कलमा लावण्यात आल्या आहेत. यापूर्वी भारतीला शनिवारी साडेतीन तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आले होते. भारती रात्रभर NCB च्या वुमन सेलमध्ये होती. शनिवारी NCB च्या रेडमध्ये भारतीच्या घरी आणि ऑफीसमधून 86.5 ग्राम गांजा मिळाला होता. तिने पती हर्षसोबत गांजा घेतल्याची कबुली दिली होती.

सूत्रांनी सांगितल्यानुसार, NCB ने भारती आणि हर्षला एका ड्रग पेडलरसमोर बसवून प्रश्न विचारले, यानंतर दोघांनी गांजा घेतल्याची कबुली दिली. ड्रग पेडलरने शुक्रवारी चौकशीत भारती आणि हर्षचे नाव घेतले होते. यानंतर शनिवारी भारतीच्या अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवाच्या घरी आणि ऑफिसमध्ये रेड मारण्यात आली. भारतीच्या घरातील कर्णचाऱ्यांचीही चौकशी सुरू आहे.

6 महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो

NCB च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, भारती सिंहच्या घरातून सापडलेल्या गांजाची मात्रा कायद्यानुसार कमी आहे. एक किलोपर्यंतच्या गांजाला सर्वात कमी क्वांटिटी मानले जाते. त्यामुळे याप्रकरणी भारतीला दोषी आढळल्यास 6 महीन्यांपर्यंतची शिक्षा किंवा 10,000 रुपयांचा दंड लागू शकतो.

बातम्या आणखी आहेत...