आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयात काय घडले?:दोन्हीकडून जोरदार युक्तिवाद; कोर्ट म्हणाले- राऊतांवर आरोप गंभीर, पण 8 दिवसांच्या कोठडीची गरज नाही

मुंबई9 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

पत्राचाळ घोटाळ्यातील संशयित आरोपी शिवसेना खासदार संजय राऊत यांना चार दिवस अर्थात चार ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी पीएमएलए न्यायालयाने आज सुनावली. राऊत यांच्यावरील आरोप गंभीर आहेत पण आठ दिवस रिमांडची गरज नाही, अशी टिप्पणी करीत न्यायालयाने राऊत यांना 4 दिवसांची रिमांड सुनावली.

कोर्टात काय घडले?

जेष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी संजय राऊतांसाठी युक्तिवाद केला, तर ईडीतर्फे हितेन वेणेगावकर यांनी युक्तिवाद केला. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सुनावणी आज झाली. यात संजय राऊत यांनी न्यायालयात जाताना मला आणि पक्षाला संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला. आज संजय राऊतांचे वकील आणि ईडीकडून बाजू मांडली.

संजय राऊतांना सत्र न्यायालयात हजर केले, कोर्ट रूम नंबर 16 मध्ये न्यायाधीश एम.जी. देशपांडे यांच्यासमोर ईडीने रिमांडसाठी संजय राऊतांना हजर केले, याच कोर्टात पत्राचाळ संदर्भातील सुनावणी सुरू असल्याने या कोर्टात हजर करण्यासाठी विशेष कोर्टाची परवानगी, ईडीने कोर्टनंबर 54 मधून न्यायाधीशांचे नाहरकत प्रमाणपत्र मिळवत संजय राऊतांना या कोर्टात हजर केले.

ईडीचा युक्तिवाद

 • संजय राऊतांनी गुन्हेगारीच्या उत्पन्नातून संपत्ती खरेदी केली.
 • त्या पैशातून किहीम बीचवर जमीन खरेदी
 • एक जागा सपना पाटकर यांच्या नावे घेण्यात आली.
 • संजय राऊतांना आठ दिवसांची ईडी कोठडी मिळावी.
 • 2010-11 ला संजय राऊतांना प्रवीण राऊत यांच्याकडून दरमहा दोन लाख
 • संजय राऊतांच्या परदेशदौऱ्यासाठी प्रवीण राऊत यांच्याकडून पैसा​
 • पीएमएलए कायद्यानूसार हा गुन्हा आहे.

राऊतांच्या वकीलांची बाजू

 • संजय राऊत यांच्यावर राजकीय हेतूने प्रेरीत कारवाई होत आहे.
 • काही प्रश्नांची उत्तरे येत नसतील तर तो गुन्हा नाही
 • पण तपासात असहकार्य असे ईडी म्हणते.
 • राऊत राजकीय नेते आहेत. ते अधिवेशनात होते म्हणून ईडीच्या चौकशीला गैरहजर होते. पण असहकार्य राऊत करीत होते हे म्हणणे चूक आहे. त्यामुळे राऊतांना अटक करणे योग्य नव्हते.
 • ईडी अधिकारी सकाळी साडे सातवाजता संजय राऊतांकडे आले पण अटक रात्री बारा वाजता
 • एवढ्या उशीरा अटक का? ईडीकडे पुरावे नव्हते का?
 • संजय राऊत हृदयरोगी त्यामुळे त्यांची चौकशी रात्री केली जाऊ नये अशी बाजू राऊत यांच्या वकीलांनी कोर्टात केली.

न्यायालयाने काय म्हटले?

 • संजय राऊत यांनी सहकार्य केले.
 • आरोप गंभीर आहेत पण आठ दिवसांच्या कोठडीची गरज नाही.
 • संजय राऊत यांना चार दिवस पोलिस कोठडी दिली.
 • संजय राऊत यांची रात्री दहानंतर चौकशी करू नये.
 • न्यायालयाने संजय राऊत यांना दिलासा दिला. त्यांना घरचे अन्न आणि औषधी पुरवण्याची मागणी वकीलांनी केली होती, ती न्यायालयाने मान्य केली.

न्यायव्यवस्था परफेक्ट न्याय देईल- सुनील राऊत

खासदार संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनिल राऊत म्हणाले, भाजपविरोधात बोलले म्हणून संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांना अटक केली तरीही न्यायव्यवस्था न्याय देईल. काल सकाळी साडेसात वाजता चौकशी ईडीने सुरु केली. आज दुपारपासून न्यायालयात संजय राऊत यांची वाट पाहात होतो पण त्यांची मेडीकल चाचणी झाली. त्यानंतर कोर्टात त्यांना हजर करण्यात आली आहे. न्यायव्यवस्था परफेक्ट न्याय आम्हाला देणार आहे.

बातम्या आणखी आहेत...