आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Jitendra Awhad On Maha Vikas Aaghadi NCP cong  Disappointed , Jitendra Awhad Said, "There Are Some Differences, But We Are Fully Supportive Of The Chief Minister."

नाराजी नाट्य:लॉकडाऊनवरुन राज्य सरकारमधील मतभेदावर जितेंद्र आव्हाडांचे भाष्य, म्हणाले - थोडेसे मतभेद असतात, पण आम्ही पूर्ण ताकदीने मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. राज्यात अनेक ठिकाणी अचानक लावलेली टाळेबंदी, समन्वय समितीच्य बैठका न घेणे आणि2 किमी अंतरात वावरण्याच्या तुघलकी निर्णयावर पवार यांनी ठाकरे यांचे कान टोचल्याचे वृत्त होते. आता या सर्व नाराजी नाट्यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केले आहे. थोडेसे मतभेद असतात, मात्र आम्ही पूर्ण ताकदीने मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी आहोत असं ते म्हणाले आहेत. 

नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नवी मुंबईतील महापालिकेत बैठक घेतली. या बैठकीमध्ये येत्या आठवडाभरात नवी मुंबईकरांसाठी दोन नव्या कोरोना टेस्ट लॅब सुरु करणार असल्याचेही आव्हाडांनी सांगितले. तसेच ऑक्सिजन सिलेंडर, व्हेंटिलेटर, औषध पुरवठा वाढवण्याचे आदेशही पालिका प्रशासनाला दिले. 

महाविकास आघाडीमध्ये कुरबुरी वाढल्याच्या चर्चा वाढल्या आहेत. यावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, 'लॉकडाऊनवरुन राज्य सरकारमध्ये थोडे फार मतभेद आहेत. मात्र कोरोना काळात आम्ही पूर्ण ताकदीने मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे आहोत. '

मुंबई महानगर क्षेत्रातल्या 5 महापालिकांमध्ये शुक्रवारपासून अचानक टाळेबंदी लागू केली आहे. त्याची माहिती सरकारमधील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना नव्हती. या निर्णयासंदर्भात दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. त्यावर पवार-ठाकरे बैठकीत चर्चा झाल्याचे वृत्त होते. मुंबईत दोन किमी क्षेत्रात नागरिकांनी वावर ठेवावा, असे परिपत्रक मुंबई पोलिस आयुक्तांनी काढले होते. विशेष म्हणजे याची माहिती खुद्द गृहमंत्री अनिल देशमुखांनाच नव्हती. त्यानंतर अनलाॅक 2.0 च्या नियमात 2 किमी शब्द वगळून आसपासच्या परिसरात वावर ठेवावा, याचा अंतर्भाव करण्यात आला. 

राज्यात 19 ठिकाणी पुन्हा टाळेबंदी लागू केल्याची आपल्यालाही कल्पना नव्हती, असे पवार यांनी उद्धव यांना सांगितल्याचे समजते. आपण आता मिशन बिगिन अगेन अंतर्गत पुढे जाण्याचे ठरवले आहे, त्यामुळे टाळेबंदी शक्यतो लागू करण्यात येऊ नये, असे पवार यांनी सांगितल्याचे समजते.

0