आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्मदहनाचा प्रयत्न:स्वातंत्र्यदिनीच मंत्रालयासमोर शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगावच्या शेतकऱ्याने मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल टाकत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. तर दुसरीकडे मंत्रालयाच्या परिसरात शेतकऱ्याने प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली.

दरम्यान, पोलिसांनी वेळीच शेतकऱ्याला ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला. सुनील गुजर असे या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतीत झालेले मोठे नुकसान, घर गहाण पडले आहे. आर्थिक चणचण आहे, त्यामुळे शेतकऱ्याने आत्महदनाचा प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण सोहळा
कोरोनाला पराभूत करत आपल्याला कोरोनामुक्त व्हायचे आहे. आपण सर्वजण मिळून नक्कीच या संकटावर मात करू. मी माझा देश, राज्य कोरोनामुक्त करणारच आणि पुढील स्वातंत्र्यदिन कोरोनामुक्त वातावरणातच साजरा करणार असा सर्वजण मिळून निश्चय करुया, यासाठी संयम आणि शिस्तीचे पालन करुया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले. स्वातंत्र्याच्या 74 व्या वर्धापनदिनानिमित्त मंत्रालय प्रांगणात आयोजित राष्ट्रध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. भारतीय स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मुख्यमंत्र्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व शहीदांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

बातम्या आणखी आहेत...