आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार:‘भारत जोडो’ची बदनामी करणाऱ्याविरोधात तक्रार

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर काढलेल्या भारत जोडो यात्रेची बदनामी करणाऱ्या प्रकाश गाडे आणि साईनाथ शिरपुरे या दोघांविरोधात मुंबईतील कुलाबा पोलिस ठाण्यात सोमवारी ( २१ नोव्हेंबर) तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती प्रदेश काँग्रेस लीगल सेलचे अध्यक्ष अॅड. रविप्रकाश जाधव यांनी दिली. भारत तोडो यात्रेचे पास २० हजार रुपयांना विकले, अशी अफवा पसरवत राहुल गांधी व काँग्रेसची बदनामी करू पाहणाऱ्या दोन व्यक्तींविरोधात काँग्रेस कमिटीच्या लीगल सेलमार्फत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. ‘भारत जोडो यात्रेत मोठा आर्थिक घोटाळा! राहुल गांधींसोबत चालण्यासाठी प्रत्येकाला विशेष पासेस देण्यात आले होते. एका विशेष पासची किंमत प्रतिव्यक्ती २० हजार रुपये एवढी होती,’ अशी अफवा प्रकाश गाडे याने सोशल मीडियाद्वारे पसरवली आहे. प्रकाश गाडे हा भाजपशी संबंधित असून गेल्या वर्षी त्याची भाजपच्या महाराष्ट्र सोशल मीडिया संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...