आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोध:94 नगरसेवकांची शिंदेंकडे तक्रार; चहलांविरुद्ध नाराज

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक आक्रमक झाले आहेत. मुंबई महापालिकेवर आयुक्त इक्बाल चहल हे मार्च २०२२ पासून प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९४ माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंगळवारी (ता.१३) पत्र लिहित तक्रार केली आहे.

आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या कार्यकाळात सुरू असलेल्या कामांमुळे आणि निर्णयांमुळे मुंबई महापालिकेचा दर्जा खालावत असल्याची तक्रार पत्रात करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या आधीच महाविकास आघाडीच्या नगरसेवकांमध्ये एकजूट दिसून येत आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी विरोधी पक्षनेते रवी राजा, राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांच्यासह ९४ नगरसेवकांनी पत्र लिहिले आहे.

बातम्या आणखी आहेत...