आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीका:आयोगाकडे अंधेरीमध्ये ‘नोटा’च्या प्रचाराची तक्रार; भाजपचा उल्लेख करत परबांची टीका

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतल्यानंतरही शिवसेना-उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंच्या विजयाच्या मार्गात अडथळे कायम आहेत. ठाकरे गटाने अंधेरी निवडणुकीत नोटाचा प्रचार करणाऱ्यांच्या क्लिप्सही निवडणूक आयोग आणि पोलिसांना दिल्या असल्याची माहिती आमदार अनिल परब यांनी दिली.

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ३ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके आणि अनिल परब यांची पत्रकार परिषद मंगळवारी (१ नोव्हेंबर) झाली. या पत्रकार परिषदेत अनिल परब यांनी नोटाच्या प्रचाराबद्दल माहिती दिली.

परब म्हणाले, ‘आमच्याकडे जी माहिती आली आहे त्यानुसार लोकांना पैसे देऊन ‘नोटा’चे बटण दाबण्यासाठी प्रचार केला जात आहे. यासंदर्भात मी निवडणूक आयोगात आणि पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. ज्या भागातून ही माहिती मिळाली त्या भागांची नावे आम्ही पोलिसांना आणि निवडणूक आयोगाला दिली आहेत,’ अशी माहिती अनिल परब यांनी दिली.

‘आम्ही निवडणूक आयोगाला आवाहन केले आहे की, नोटा हा त्या माणसाचा अधिकार असतो. हा काही प्रचाराचा भाग नसतो. एखाद्या व्यक्तीला कोणताही उमेदवार योग्य वाटला नाही तर त्याने नोटाचे बटण दाबयचे असते. हा त्याचा मूलभूत अधिकार असतो. त्याचा प्रचार करता येत नाही. अशा प्रकारे प्रचार करणाऱ्या क्लिप्स आमच्या हाती लागल्या आहेत. त्या क्लिप्स आम्ही निवडणूक आयोगाला दिल्या आहेत. मला खात्री आहे की, निवडणूक आयोग यावर तातडीने कारवाई करेल,’ असे अनिल परब म्हणाले. ‘मी जे व्हिडिओ बघितलेत त्यात आरपीआयचे पदाधिकारी उघडपणे हा प्रचार करत आहेत. त्याच्या क्लिप्स आमच्याकडे आल्या आहेत. आरपीआय भाजपच्या सोबत असलेला पक्ष आहे. त्या पक्षाचे समर्थन भाजपला आहे,’ असे अनिल परब यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...