आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकरी बांधवांनो घाबरु नका:बोगस बियाण्यांच्या तक्रारी वाढल्या, आता याप्रकरणी गंभीर गुन्हे होणार दाखल, शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देणार - मुख्यमंत्री 

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शेतकरी बांधवांनो तुम्ही काळजी करु नका हे सरकार तुमचं सरकार आहे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यभरात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला संबोधित करत असतात. रविवारी त्यांनी जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी कोरोना संकटासोबतच शेतकऱ्यांच्या संकटावरही संवाद साधला आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, सध्या बोगस बियाण्याच्या तक्रारी ग्रामीण भागातून येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. पण आता आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल होणार आहे. त्यांना योग्य ती शिक्षा दिली जाईल. यासोबतच शेतकरी बांधवांना नुकसानभरपाई मिळवून देणार असल्याचंही ते म्हणाले.    पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातून मराठवाडा, विदर्भ या भागातील काही ठिकाणांवरुन बोगस बियाणांबाबत अनेर तक्रार येत आहेत. याची गंभीर दखल आपण घेत आहोत. मात्र हे अत्यंत दुर्दैवी आहे. मी शेतकऱ्यांना एकच सांगेल की, तुम्ही काळजी करु नका हे सरकार तुमचं सरकार आहे. ज्यांनी ज्यांनी तुमची फसवणूक केली आहे ते कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाहीत. त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करुन शिक्षा देण्यात येईल. तसेच  तुमचं जे जे नुकसान झालं आहे, ज्यांनी ते केलं आहे त्यांच्याकडून हे सरकार तुम्हाला नुकसान भरपाई सुद्धा मिळवून दिल्याशिवाय राहणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. 

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser