आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

65 हजार कोटींपेक्षा जास्त:रिअल इस्टेट कंपन्यांवर विश्वास वाढला, विक्री 25 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाच वर्षांपासून देशातील प्रमुख शहरांमध्ये लिस्टेड रिअल इस्टेट कंपन्यांचा वाटा सतत वाढत आहे. आर्थिक वर्ष २०१९--२० मध्ये शेअर मार्केटमध्ये लिस्टेड डेव्हलपर्सचा बाजारातील वाटा अवघा १४% होता. २०२३--२४ मध्ये तो वाढून एक चतुर्थांश म्हणजे २५% पर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रेटिंग एजन्सी क्रिसिलनुसार, चालू आर्थिक वर्षात टॉप ११ रिअॅल्टी कंपन्यांची विक्री २५% वाढून जवळपास ६५ हजार कोटी रुपये होण्याचा अंदाज आहे.

पुढील आर्थिक वर्षात त्यांची विक्री १०-१५% वाढून ७२-७५ हजार कोटींपर्यंत जाऊ शकते. गुरुवारी आलेल्या अहवालानुसार, देशातील टॉप- ६ शहरांमध्ये घरांच्या किमती यंदा ६-१०% आणि पुढील वर्षी ३-५% वाढू शकतात. किमती वाढूनही लोक मोठी घरे घेणे पसंत करत आहेत. मागणी वाढल्याने डेव्हलपर्सही मोठी घरे जास्त बनवत आहेत. घरांच्या इन्व्हेंटरीत १.५ कोटींपेक्षा महाग लक्झरी घरांचा वाटा ४०-४५% झाला आहे, जो कोरोनाच्या आधी २५-३०% होता. तर ४० लाखांपेक्षा कमी दराच्या घरांची इन्व्हेंटरी ३०% नी घटून १०% झाली आहे.

चांगला ट्रॅक रेकॉर्ड, वेळेवर डिलिव्हरीने आकर्षण वाढले क्रिसिल रेटिंग्जचे संचालक गौतम शाही यांच्यानुसार, मोठ्या रिअॅल्टी कंपन्यांना ग्राहक प्राधान्य देत आहेत. चांगले ट्रॅक रेकॉर्ड आणि वेळेवर डिलिव्हरी याचे कारण आहे. चालू आर्थिक वर्षात नवीन लाँचिंगमध्ये ११ मोठ्या लिस्टेड डेव्हलपर्सचा वाटा वाढून ४०-४५% होण्याचा अंदाज आहे. २०१९-२० मध्ये त्यांचा वाटा ३०% होता. आर्थिक वर्षात त्याचे मार्केट शेअर वाढले.

बातम्या आणखी आहेत...