आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शैक्षणिक:मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षेत पुन्हा गोंधळ, पेपर पुढे ढकलला

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई विद्यापीठअंतर्गत येणाऱ्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षेदरम्यान मंगळवारी पुन्हा गोंधळ झाला. विद्यार्थ्यांच्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षेला दुपारी १ वाजता सुरवात होणारी मात्र लिंक मिळून सुद्धा तांत्रिक अडचणीला सामोरे जावे लागले. याबाबत विद्यापीठाकडून कोणातच प्रतिसाद मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी थेट कलिना विद्यापीठ गाठून आयडॉल इमारती समोर गोंधळ घातला.

अंतिम वर्ष परीक्षेचा पहिला पेपर ३ ऑक्टोबरला होता. त्या पेपरदरम्यान सुद्धा तांत्रिक अडचणी आल्याने हा पेपर पुढे ढकल्याने आता तरी पुढील परीक्षा व्यवस्थित देता येईल या विचाराने आज परीक्षेला विद्यार्थी ऑनलाइन मोबाइल, लॅपटॉप, संगणक घेऊन बसले. पण परीक्षेसाठी मिळालेली लिंक ओपन होत नसल्याने विद्यार्थी हताश झाले. तर काही विद्यार्थ्यांची लिंक ओपन झाली. मात्र, लॉग इन होत नसल्याने परिक्षेचे आता काय होणार ? असा प्रश्न पडल्याने हेल्पलाईन नंबरवर कॉल करण्यास सुरुवात केली पण तिथे सुद्धा कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने संतापून विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे धाव घेत गोंधळ घातला.

सुरवातीला तांत्रिक अडचणी दूर करण्याचा आम्ही काम करत असल्याचं सांगत विद्यापीठाने परीक्षा उशिरा सुरू करण्याचे ठरविले पण ही तांत्रिक अडचण लवकर सोडवणे कठीण असल्याचे समजताच विद्यार्थ्यांचा गोंधळ पाहून ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला असून लवकरच या आजच्या परिक्षेबाबतचा वेळापत्रक जाहीर केल जाणार असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...