आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुंबई:फडणवीस यांची केंद्रीय समितीमध्ये नियुक्ती झाल्याच्या टि्वटने गोंधळ

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव, भाजपकडून इन्कार

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या केंद्रीय संसदीय समितीमध्ये नियुक्ती झाल्याबद्दल पक्षाच्या नेत्यांनी अभिनंदनाचे गुरुवारी टि्वट केले. ते टि्वट मोठ्या संख्येने रिटि्वट होऊ लागले. शेवटी फडणवीस यांची केंद्रात नियुक्ती झालेली नाही, असा खुलासा प्रदेश भाजपला करावा लागला. भाजपचे इंदापूरचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी दुपारी अभिनंदनाचे टि्वट केले. नागपूर दक्षिणचे आमदार सुधाकर कोहळे यांनीही असेच टि्वट केले. त्यावर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी खुलासा केला. ते म्हणाले, ‘माझे आताच आपले नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी बोलणे झाले. अद्याप अशी कोणतीही नियुक्ती झालेली नाही. त्यांच्या या खुलाशानंतर हा गोंधळ शांत झाला.