आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुप्रिया सुळेंची विनंती:व्याजदरांमध्ये कपात करण्याचा निर्णय तातडीने फिरवल्याबद्दल अभिनंदन निर्मलाजी! आता 'या'वर देखील अशीच तत्परता दाखवा

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 31 मार्च रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास सरकारने लहान बचत योजनांचे व्याज दर कपात करण्याचा निर्णय घेतला होता

छोट्या बचत योजनांवरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने मागे घेतला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अवघ्या 12 तासांमध्ये हा निर्णय मागे घेतला आहे. आता यावरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच आता पेट्रोल-डिझेल, गॅस यांवरीलही दरवाढ मागे घ्या अशी विनंती त्यांनी केली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या...

सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे अभिनंदन केले आहे. यासोबतच त्यांनी काही मागण्याही केल्या आहेत. त्या म्हणाल्या की, 'अल्पबचतीवरील व्याजदरांमध्ये कपात करण्याचा निर्णय सरकारने तातडीने फिरविला. सरकारचे याबद्दल अभिनंदन. यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला.आता केंद्र सरकारने अशीच तत्परता पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाचा गॅस यांवर लादलेली मोठी दरवाढ देखील तात्काळ मागे घ्यावी ही विनंती.'

12 तासात मागे घेण्यात आला निर्णय
31 मार्च रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास सरकारने लहान बचत योजनांचे व्याज दर कपात करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर सकाळी आठच्या सुमारास हा निर्णय मागे घेण्यात आला. अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या की लहान बचत योजनांना लागू असलेले दर त्याच पातळीवर राहतील, ज्या आर्थिक वर्ष 2020-21 च्या शेवटच्या तिमाहीत होत्या. त्या पुढे म्हणाले की दर कमी करण्याचा पूर्वीचा आदेश लवकरच मागे घेतला जाईल.

बातम्या आणखी आहेत...