आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:सरकार पाडण्यासाठी फडणवीस यांना शुभेच्छा, खासदार संजय राऊत यांंचा खोचक टोला

मुंबई9 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातले महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी नवी तारीख मुकर्रर केली असेल तर त्या तारखेला आमच्या शुभेच्छा आहेत, असा खोचक टोला शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी फडणवीस यांना लगावला.

संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, फडणवीस आणि आमचे वैयक्तिक वाद नाहीत. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो. आमचे राजकारणातील युद्ध आम्ही लढूच, असे सांगत त्यांनी फडणवीस यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राऊत यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगाने २४ तासांची प्रचारबंदी लादण्यात आल्याबद्दल संताप व्यक्त केला. महाभारताचेही युद्ध लढले गेले. त्या वेळी शिखंडीला पुढे करून युद्ध लढले गेले. पश्चिम बंगालमध्येही युद्ध सुरू आहे. पण पश्चिम बंगालचे शिखंडी कोण आहेत त्याचा शोध घेतला पाहिजे. कोणत्या शिखंडींना पुढे करून बंगालमधील युद्ध लढले जात आहे, हे पाहावे लागेल, अशी टीका राऊत यांनी केली.

राज्यातील कोरोनाची परिस्थिती तशी नियंत्रणात आहे. राज्याबाहेरून येणाऱ्या लोकांमुळे महाराष्ट्रात कोरोना वाढत आहे. त्याकडेही लक्ष दिलं पाहिजे, असे राऊत म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...