आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Congress Cannot Add Bharat Todo Yatra Party To Bharat Todo Yatra, What Will The Country Add? Ramdas Athawale Criticizes Rahul Gandhi On Yatras

काँग्रेसची भारत जोडो यात्रा नव्हे तोडो यात्रा:रामदास आठवलेंची राहुल गांधींवर टीका; पक्ष जोडता येत नाही ते देश काय जोडणार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ज्यांना स्वतःचा पक्ष जोडता येत नाही, ते देश काय जोडणार, अशी खोचक टीका केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी राहुल गांधींवर केली. भारत जोडो यात्रेला भारत तोडो यात्रा संबोधत काँग्रेस पक्षाची अवस्था गलितगात्र झाली असल्याचा हल्लाबोल आठवलेंनी केला आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे काल संध्याकाळी सातारा जिल्ह्यातील कराड येथे आले असता पत्रकारांशी बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळा भारत जोडला आहे. राहुल गांधींना स्वतःचा पक्ष जोडता येत नाही, ते देश काय जोडणार? पंतप्रधान नरेंद्र मोंदीचा सामना करणे हे राहुल गांधींचे काम नाही. नरेंद्र मोदींशी सामना करणारा देशात सध्या दुसरा कोणीही नेता नाही. बिहारचे नितीशकुमार हे मोदींच्या विरोधात विरोधकांना भेटत असले तरी मोदींशी सामना करणे येऱ्या गबाळ्याचे काम नाही. जेवढे विरोधक एकत्र येतील तेवढा मोदींनाच फायदा होईल, असा टोला आठवलेंनी विरोधकांना मारला.

मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला बरोबर घेतल्यास मनसेमुळे परप्रांतीयांची मते मिळणार नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि भाजपने मनसेला बरोबर घेऊ नये. शिंदे गट सध्या आरपीआय आणि भाजपबरोबर असल्यामुळे मनसेची गरज नसल्याचे रामदास आठवले म्हणाले.

केंद्रीय मंत्री आता बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यासाठी येणार असून शरद पवारांची बारामती आपल्या ताब्यात कशी येईल, यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. बारामती मतदार संघात भाजपची हवा असल्याने बारामतीची जागा आम्ही जिंकू, असा आम्हाला विश्वास असल्याचे रामदास आठवलेंनी सांगितले. तसेच 2024 च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान असतील, असेही आठवले यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...