आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअदानी घोटाळ्याच्या चौकशीसाठी जेपीसीपेक्षा सर्वोच्च न्यायालयाची समितीच योग्य राहील, असे स्पष्ट मत शरद पवार यांनी काल पत्रकार परिषदेत मांडले. यावरुन काँग्रेसकडून शरद पवार यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. मात्र काँग्रेसच्या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेस नव्हे तर भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राजकीय वर्तुळात या जवळीकीमुळे चर्चांना उधाण आले आहे.
अदानी घोटाळ्याची जेपीसीद्वारे चौकशी करावी, या मागणीसाठी काँग्रेससह विरोधी पक्ष रस्त्यावर उतरला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. नाना पटोले, अशोक चव्हाण यांनी जेपीसीमार्फत चौकशी व्हावी, अशी भूमिका घेतली आहे. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही आपण जेपीसी चौकशीवर ठाम असल्याचे म्हटले आहे.
काँग्रेसची टीका
काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा यांनी शरद पवार यांच्या जेपीसी भूमिकेवरुन टीका केली आहे. अलका लांबा म्हणाल्या, घाबरलेले, स्वार्थी लोक आज आपल्या वैयक्तिक हितासाठी सत्तेचे गुणगान गात आहे. देशातल्या लोकांची लढाई राहुल गांधी एकटेच लढत आहेत. भांडवलदार चोरांपासून तसेच चोरांना संरक्षण देणाऱ्या चौकीदाराशीही ते एकटेच लढत आहेत.
भाजपचे प्रत्युत्तर
अलका लांबा यांच्या या टीकेला आता भाजपने उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, राजकारण होत राहील. पण काँग्रेसच्या एका नेत्याने त्यांच्या 35 वर्षांच्या दीर्घकाळ सहयोगी आणि भारतातील सर्वात ज्येष्ठ राजकीय नेत्यांपैकी एक आणि महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री असलेल्या शरद पवार यांच्याविषयी केलेले हे ट्विट भयावह आहे. राहुल गांधी भारताची राजकीय संस्कृती बिघडवत आहेत.
काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार म्हणाले, जेपीसीमध्ये लोकसभा व राज्यसभेत जो सर्वात मोठा पक्ष आहे, त्याच्याच खासदारांची संख्या अधिक असते. अदानी घोटाळ्याच्या चौकशीसाठी आता जेपीसी बनवलीच तर त्यात भाजपचे 15 खासदार असतील. उर्वरित 6 ते 7 खासदार विरोधी पक्षातील असतील. ज्या जेपीसीत विरोधकांची संख्या एवढी कमी आणि सत्ताधाऱ्यांची संख्या अधिक असेल, अशा समितीच्या निर्णयावर शंका उपस्थित करायला वाव आहे.
संबंधित वृत्त
मतभेद:शरद पवार यांचे वैयक्तिक मत
अदानी घोटाळ्याच्या चौकशीसाठी जेपीसीपेक्षा सर्वोच्च न्यायालयाची समितीच योग्य राहील, असे स्पष्ट मत शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत मांडले. शरद पवार यांच्या या भूमिकेवर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवार यांचे वैयक्तिक मत असू शकते. मात्र जेपीसी घोटाळ्याची चौकशी होऊ शकते असे म्हणत पटोलेंनी कोळसा घोटाळ्याच संदर्भ दिला आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.