आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेस नेत्यांनी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी मंगळवारी भेट घेतली. ओबीसी आरक्षण प्रश्नी तोडगा निघाला पाहिजे, अन्यथा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आघाडीला जड जातील, अशी भीती या नेत्यांनी पवार यांच्याकडे व्यक्त केल्याचे समजते. या वेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पवारांकडे नेणे शिष्टमंडळाने टाळले.
संध्याकाळी काँग्रेसचे राज्य प्रभारी एच. के. पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पवारांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या वेळी या नेत्यांनी पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
बैठकीत मराठा आणि ओबीसी आरक्षणावरही चर्चा झाली. राज्य सरकारने विधानसभेत मराठा आणि ओबीसी आरक्षणाचे ठराव मंजूर केले आहेत. हे ठराव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहेत. त्यावर अशोक चव्हाण यांनी सल्ला घेतला. बैठकीत विधानसभेच्या अध्यक्षपदाबाबतही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, रविवारीच पवारांनी पटोलेंवर टीका केली होती. त्यामुळेच पटोले यांना पवारांकडे नेण्याचे टाळल्याचे समजते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.