आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:सोनिया गांधींचे पत्र काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना सोपवले, किमान समान कार्यक्रमाकडे दुर्लक्ष

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील अनुसूचित जाती- जमातींसाठी असलेल्या कल्याणकारी योजनांसंदर्भात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र सोमवारी प्रदेश काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवले. भेटीनंतर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले, महाविकास आघाडी सरकारला जसे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मार्गदर्शन करतात, तसेच सोनिया याही मार्गदर्शन करत असतात. प्रत्यक्ष भेट झालेली नसली तरी हा पत्ररूपी संवाद आहे. थोरात यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळामध्ये ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, भाई जगताप, नसीम खान आदींचा समावेश होता.

किमान समान कार्यक्रमाकडे दुर्लक्ष
महाविकास आघाडी सरकारचे किमान समान कार्यक्रमाकडे दुर्लक्ष होत असल्याचा घरचा आहेर दिल्ली येथे बोलताना काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ठाकरे सरकारला दिला.

बातम्या आणखी आहेत...