आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस:आशिष देशमुख यांना काँग्रेसने दिली नोटीस

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल उघडपणे टीका करणाऱ्या काँग्रेस नेते आशिष देशमुख यांना बुधवारी पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. शिस्तपालन समितीने यासंदर्भातील माहिती दिली आहे. देशमुख यांच्याकडून खुलासा करण्यात आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते. विदर्भातील काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांवर उघडपणे टीका केली होती. त्याविरोधात अनेकांनी त्यांच्याविरोधात तक्रार केल्यानंतर बुधवारी मुंबईत शिस्तपालन समितीची बैठक पार पडली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीत चव्हाण यांच्यासह माजी खासदार भालचंद्र मुणगेकर आणि माजी आमदार उल्हास पवार उपस्थित होते. काटोल हा विधानसभा मतदारसंघ आहे. पण, मागच्या वेळी त्यांना त्यांच्या काँग्रेस पक्षाने येथून उमेदवारी दिली नव्हती.