आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Congress In A Hurry To Expand State Cabinet; Nationalist, Shiv Sena Calm; The Moment Of Expansion Will Come At The End Of August; News And Live Updates

मंत्रिमंडळ विस्तार:राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची काँग्रेसला घाई; राष्ट्रवादी, शिवसेना शांत; ऑगस्टअखेरीस विस्ताराचा निघणार मुहूर्त

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • संजय राठोड पुन्हा इन के.सी. पाडवी आऊट ?

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडल्यानंतर आता राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ऑगस्टअखेरीस तिन्ही पक्षांतील रिक्त मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रवादीकडे १४ मंत्रिपदे असून अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे या विभागाचा कारभार दिला आहे.

शिवसेनेकडे १२ मंत्रिपदे असून वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर हे खाते मुख्यमंत्री सांभाळत आहेत. तर काँग्रेसकडे १० मंत्री असून त्यांच्या वाट्याचे विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे. काँग्रेसमध्ये साेलापूरच्या प्रणिती शिंदे आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. तसेच गृहराज्यमंत्री बंटी पाटील यांना मंत्रिमंडळात बढती मिळण्याच्या चर्चा आहेत.

राष्ट्रवादी व शिवसेनेला मंत्रिमंडळ विस्ताराची अजिबात घाई नाही. त्यामुळे आणखी महिना ते दीड महिना तरी मंत्रिमंडळ विस्तार शक्य नसल्याचे सांगण्यात येते. मंत्रिमंडळ विस्तार, महामंडळांचे वाटप आणि विधानसभा अध्यक्षाची निवड करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला आत्मविश्वासाने लागायचे, अशी रणनीती आघाडीच्या नेत्यांची आहे.

संजय राठोड पुन्हा इन के.सी. पाडवी आऊट ?
संजय राठोड यांनी पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी राजीनामा दिला होता. मात्र याप्रकरणी तक्रार नसल्याने राठोड यांचा पुन्हा मंत्रिमंडळात प्रवेश होऊ शकतो. काँग्रेसच्या मंत्र्यांत मोठे फेरबदल होऊ शकतात. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी किंवा मत्स्यविकास मंत्री अस्लम शेख यांच्यापैकी दोघांचे खाते काढले जाण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...