आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:अर्णबच्या चौकशीसाठी काँग्रेस नेते आक्रमक, व्हॉट्सअॅप चॅटमधून अनेक गंभीर बाबी उघड

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • खोटारडे आमदार मेटे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी

रिपब्लिक टीव्ही वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅटमधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातील गोपनीय माहिती अर्णबपर्यंत कशी पोहोचली, ज्याला पुलवामा हल्ल्याचा लाभ होणार ती मोठी व्यक्ती कोण याची चौकशी करावी या मागणीसाठी प्रदेश काँग्रेस शुक्रवारी (ता.२२) राज्यव्यापी धरणे आंदोलन करणार आहे. यासंदर्भात माहिती देताना प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले, काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोट येथे भारताने हवाई हल्ला केला.

ही कारवाई होण्याच्या तीन दिवस आधी म्हणजे २३ फेब्रुवारी २०१९ रोजी याची माहिती अर्णब गोस्वामी यांना कशी मिळाली, त्यांनी अजून कोणाला ही माहिती दिली का, हे तपासणे गरजेचे आहे.

खोटारडे आमदार मेटे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी
मुंबई | मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात बुधवारी झालेल्या सुनावणीत राज्य शासनाच्या वकिलांनी आमची तयारी झालेली नाही, असे कुठेही म्हटले नाही. जे सर्वोच्च न्यायालयात बोललेच गेले नाही, जे घडलेच नाही, ते सांगून महाराष्ट्राची दिशाभूल करणाऱ्या खोटारड्या आ. विनायक मेटेंनी माफी मागावी, असे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितले. आ. मेटे यांनी गुरुवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात राज्य शासनाच्या वकिलांनी सुनावणीसाठी आमची तयारी नसल्याचे सांगितल्याचा आरोप केला आहे.

बातम्या आणखी आहेत...