आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चव्हाणांच्या 'भाजप'वारीवर दानवेंची प्रतिक्रिया:कोणी असंतुष्ट आमच्या पक्षात आले तर स्वागतच, दुसरा पक्ष फोडण्यात इंटरेस्ट नाही

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आम्हाला कोणता दुसरा राजकीय पक्ष फोडण्यात इंटरेस्ट नाही. भारतीय जनता पार्टी कोणता पक्ष फोडत नाही. पण कोणत्या पक्षात फूट पडून ते आम्हाला मदत करायला येत असतील तर त्यांच्यासोबत एकत्र यायला तयार आहोत. आता अशोक चव्हाण यांची चर्चा आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात स्वातंत्र्य काळात सर्वांनी एकत्र येण्याच्या उद्देशाने केली होती. आता गणपती उत्सवामध्ये सर्वच जण एकमेकांकडे जातात.

देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांची एका त्रयस्थ व्यक्तीच्या घरी भेट झाली. त्याचे असे अर्थ लावण्यात आले. त्यांच्यामध्ये असंतोष असेल तरी त्याचा आम्ही आता काही उपयोग करणार नाही. पण आम्हाला जेव्हा गरज पडेल उपयोग होईल. तेव्हा आम्ही असंतुष्टांचा उपयोग करून घेऊ, असे स्पष्टीकरण केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले आहे.

चव्हाणांची कबुली

काँग्रेस नेते अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू असून, त्यांनी उपमुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची देखील भेट घेतली आहे. दरम्यान, चव्हाण यांनी याविषयी माहिती देताना म्हटले आहे की, "मी आशिष कुलकर्णींच्या घरी दर्शनासाठी गेले होतो, तेव्हा फडणवीस यांच्याशी उभ्या-उभ्या भेट झाली. आम्ही गणपतीच्या दर्शनाला गेलो होतो. कुठलीही चर्चा किंवा बैठक झाली नाही. परवा काँग्रेसचा दिल्लीत मोर्चा आहे, त्यासाठी मी उद्या दिल्लीला जाणार आहे." असे चव्हाण म्हणाले होते. त्यानंतर मात्र, चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यावर आता रावसाहेब दानवे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आम्हाला त्यात इंटरेस्ट नाही

दानवे म्हणाले की, "भाजप आणि शिवसेनेने युती करत 2019 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली. जनतने आम्हाला कौल दिला होता. परंतु, शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादींसोबत हात मिळवणी केली. याआधी शिवसेना त्यांच्यावर नेहमी आरोप करायची. त्यांनी जे सरकार बनवले ते या राज्यातील जनतेला पसंत नव्हते. त्यामुळे केवळ जनतेला नव्हे तर विधानसभेतील आमदारांना देखील हे पसंत नव्हते. त्यामुळे त्यांच्यात असंतोष निर्माण झाला आणि मूळ शिवसैनिक भाजपसोबत आले. त्यामुळे आता आम्ही बहुमतात असून, दुसरा कोणताही राजकीय पक्ष फोडण्यात इंटरेस्ट नाही. भाजप पक्षही फोडत नाही."

आम्हाला कोणाची गरज नाही

दानवे म्हणाले की, "आज आम्हाला कोणाची गरज नाही. कोणी आपल्या पक्षात असंतुष्ट होत आमच्या पक्षात आले तर स्वागत आहे. आमच्या विचारांशी सहमत व्हावे. ही वैचारिक लढाई आहे" केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हायवे दिवे येथील निवासस्थानी गणरायाच्या दर्शनासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी रात्री भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी दानवे बोलत होते.

भेटीबाबत चव्हाण काय म्हणाले?

"मी आशिष कुलकर्णींच्या घरी गणरायाच्या दर्शनासाठी गेले होतो, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझी उभ्या-उभ्या भेट झाली. या दरम्यान कुठलीही चर्चा किंवा बैठक झाली नाही. काँग्रेसचा दिल्लीत मोर्चा आहे, त्यासाठी मी उद्या दिल्लीला जाणार आहे" असे स्पष्टीकरण चव्हाण यांनी दिले आहे. भाजप आणि शिंदे गटामध्ये समन्वयासाठी नियुक्त केलेले भाजपचे पदाधिकारी आशिष कुलकर्णी यांच्या घरी काल अशोक चव्हाण आणि फडणवीस गणपतीच्या दर्शनासाठी गेले तेव्हा त्यांच्यात काही वेळ चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. ही भेट गणपतीदर्शनामुळे घडलेला योगायोग होता की कुलकर्णी यांनी समन्वयाने भेट घडवून आणली अशी चर्चा देखील रंगली होती.

बातम्या आणखी आहेत...