आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस पक्षाला चांगली वागणूक मिळत नाही. आमच्याकडे अनेक तक्रारी आहेत, त्यासंदर्भात पक्षश्रेष्ठींकडे आपण चर्चा करणार, अशी खंत काँग्रेसचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक यांनी मांडली.
आमच्याकडे अनेक तक्रारी असून, गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वीच आम्ही मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होतो. मात्र, राज्यसभेची निवडणूक असल्याने त्यावर सध्या तरी चर्चा करण्यात आली नाही, असे चव्हाण म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे अनेक दिग्गज मंडळी महाविकास आघाडीत योग्य प्रकारे वागणूक मिळत नसल्याचा आरोप करत आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले आणि त्यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. या तीन पक्षांची जरी आघाडी असली तरी आघाडीत बिघाडी असल्याचे समोर आले आहे. नाना पटोले यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीवर आरोप केला होता. ते म्हणाले होते की, राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसला कमकुवत करत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसत आहे, असेही काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी विधान केले होते.
अशोक चव्हाणांची नाराजी
नाना पटोले यांच्यानंतर काँग्रेसकडून अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडीत काँग्रेसला मिळत असलेल्या वागणुकीवर भाष्य केले आहे. राज्यसभा निवडणूक तोंडावर आल्याने आपण सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे चर्चा केली नाही. आमच्याकडे अनेक तक्रारी आहेत. त्यावर आपण चर्चा करणार असल्याचे चव्हाण म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.