आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

योगींचा मुंबई दौरा:बॉलीवूडचे लचके तोडण्याची पटकथा तयार झालीय, या पापात महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी सहभागी होऊन राज्याशी द्रोह करू नये - अशोक चव्हाण

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ताकदीच्या बळावर दुसऱ्याच्या ताटातील घास हिसकावून पोट भरणे योग्य नाही.

बॉलिवूड उत्तर प्रदेशात हलवता यावे यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी जोरदार प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. 2 डिसेंबरला त्यांचा मुंबई दौरा याहे. आता यावरुन राजकारण रंगले आहे. दरम्यान काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी यावर सडकून टीका केली आहे. 'बॉलीवूडचे लचके तोडण्याची पटकथा तयार झालीय, या पापात महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी सहभागी होऊन राज्याशी द्रोह करू नये' असे म्हणतत्यांनी राज्यातील भाजपच्या नेत्यांनाही सुनावले आहे.

'भाजपच्या 5 वर्षाच्या काळात दिवसाढवळ्या महाराष्ट्रातील अनेक उद्योग अन् कार्यालये गुजरातला पळवण्यात आली. आता महाराष्ट्रातले सरकार बदलले तर उत्तरप्रदेश सरकारच्या नावाखाली बॉलीवूडचे लचके तोडण्याची पटकथा तयार झालेली दिसते.' पण भाजपच्या काळात जे झाले ते आम्ही पुन्हा घडू देणार नाही. असा इशाराही त्यांनी दिला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी भाष्य केले आहे.

'मागील 5 वर्ष नियोजनबद्ध पद्धतीने महाराष्ट्राचे आर्थिक व औद्योगिक महत्व कमी केले जात असताना भाजपचे तत्कालीन राज्य सरकार अन् नेते गप्प होते. सरकार गेल्यानंतरही वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी त्यांनी कोरोनासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीऐवजी पीएम केअर्सला पैसे देण्यासाठी पुढाकार घेतला.' असे म्हणत त्यांनी राज्यातील भाजप नेत्यांना टोला लगावला.

'देशातील सर्व राज्यांची प्रगती झाली पाहिजे आणि त्यासाठी केंद्र व सर्व राज्यांनी एकमेकांना सहकार्य केले पाहिजे, याबाबत दूमत नाही. पण ताकदीच्या बळावर दुसऱ्याच्या ताटातील घास हिसकावून पोट भरणे योग्य नाही. या पापात महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी सहभागी होऊन महाराष्ट्राशी द्रोह करू नये.' असे म्हणत अशोक चव्हाण यांनी राज्यातील भाजपच्या नेत्यांना राज्याशी द्रोह न करण्यास सांगितले आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser