आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सागर' बंगल्यावर वॉशिंग मशिनचे काम होते:रश्मी शुक्ला-देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर बाळासाहेब थोरात यांचा टोला

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फोन टॅपिंग प्रकरणातील वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सांगर बंगल्यावर भेट घेतली. यावर सांगर बंगल्यावर वॉशिंग मशिनचे काम होते. देवेंद्र फडणवीस हे वॉशिंग मशिनचे काम करतात, असा टोला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी लगावला.

भाजप नेते मोहित कंबोज आणि रश्मी शुक्ला यांनी फडणवीसांची भेट घेतली आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर महाविकास आघाडीतील नेत्यांचे फोन टॅप केल्याचे आरोप आहेत. 2019 विधानसभा निवडणूक आणि सत्तास्थापनेदरम्यान शुक्ला यांनी मविआतील महत्त्वाच्या नेत्यांचे फोन टॅप केले, असा आरोप शुक्लांवर असून याप्रकरणी त्यांची चौकशीदेखील महाविकास आघाडीने सुरु केली होती. तसेच, राज्याच्या गुप्तचर विभागातून त्यांची बदलीही करण्यात आली होती.

सरकारला धारेवर धरणार

रश्मी शुक्ला- फडणवीस भेटीवर बाळासाहेब थोरात म्हणाले, फडणवीस हे वॉशिंग मशिनंच काम करतात. त्यामुळे कदाचित शुक्लांनी त्यांची भेट घेतली असेल. तसेच, राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यावर सभागृहात चर्चा व्हायला हवी. या मुद्द्यावरुन सरकारला आम्ही धारेवर धरणार असल्याचेही थोरात म्हणाले.

शुक्लांची पुन्हा राज्यात नियुक्ती?

रश्मी शुक्ला सध्या केंद्राच्या सेवेत आहेत. तरीदेखील त्यांनी फडणवीस यांची भेट घेतली. त्याचदरम्यान मोहीत कंबोज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक बडा नेता तुरुंगात जाणार असल्याचे भाकीत केले आहे. कंबोज यांच्या ट्विटनंतर सिंचन घोटाळ्यावरुन अजित पवार यांना अडचणीत आणण्याची भाजपची रणनिती असल्याचे बोलले जात आहे. कंबोज आणि रश्मी शुक्ला दोघेही एकाच वेळी सागर बंगल्यावर आल्याने सिंचन घोटाळ्याची चौकशी होणार का? रश्मी शुक्ला यांची राज्यात पुन्हा नियुक्ती होणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

शिंदेंनी स्वत:च्या मनाला विचारावे

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बुधवारी (ता.१७) विरोधकांनी राज्य सरकारविरोधात विधानभवनाच्या प्रवेशद्वारी जोरदार घोषणाबाजी केली.‘पन्नास खोके, सरकार ओके’, ‘स्थगिती सरकार हाय हाय’, ‘महाराष्ट्राशी गद्दारी सत्तेत आली शिंदेंची स्वारी’ अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील आपल्या आमदारांना जोरदार प्रत्युत्तर देण्याचे सांगितले आहे. यावर बाळासाहेब थोरात म्हणाले, गद्दारी गेली की नाही, हे शिंदेंनी स्वत:च्या मनाला विचारावे. तसेच, यावर ते काय प्रत्युत्तर देतात, याची प्रतीक्षा असल्याचेही थोरात म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...