आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वात पेटणार!:​​​​​​​फडणवीस सरकारच्या काळातील फायली काढणार; पत्रकार परिषदेत नाना पटोलेंचा इशारा

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काय म्हणाले नाना पटोले?

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपचं सत्र सुरुच आहे. या आरोपांमुळे महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री अडचणीत आले आहे. किरीट सोमय्या दररोज नवनवीन खुलासे करत आहे, आणखी काँग्रेसचे तीन मंत्री आपल्या रडारावर असल्याचे वक्तव्य सोमय्या केले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला इशारा दिला आहे.

ते म्हणाले की, आता महाविकास आघाडी सरकारनेही भाजप विरोधात वात पेटवण्याचा निर्णय घेतला असून लवकरच फडणवीस सरकारच्या काळातील फायली काढणार असल्याचा इशारा पटोलेंनी यांनी दिला आहे. पटोले यांनी पत्रकार परिषद घेत हा इशारा दिला आहे.

काय म्हणाले नाना पटोले?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांच्या रस्ते घोटाळ्यावरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनी स्वत: खाल्ले. परंतु, ते दिसून आले नाही. त्यामुळे पाटील यांनी किती खाल्ले ते सांगून जावे असा टोला पटोले यांनी लगावला आहे. आता वेळ आली आहे, महाविकास आघाडी एकत्र येऊन फडणवीस सरकारच्या काळातील फायली बाहेर काढणार आहे.

बातम्या आणखी आहेत...