आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्काबुक्कीत नितीन राऊत गंभीर जखमी:काँग्रेस नेते नितीन राऊत यांना तेलंगणात धक्काबुक्कीचा आरोप

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या तेलंगणात आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी गेलेले राज्याचे माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना गर्दीत धक्काबुक्की झाल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोळ्याला मार लागला असून त्यांच्यावर हैदराबाद येथील वासवी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या हाताला व पायालाही दुखापत झाली असल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले. तेलंगणात या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असून स्थानिक लोकांसह कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी होत आहे. या यात्रेतच सहभागी होण्यासाठी गेलेले राऊत यांना गर्दीत धक्काबुक्की झाल्याचा आरोप होत आहे.

बातम्या आणखी आहेत...