आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोना लस:कोरोना लसीचा दावा मोदींच्या 15 ऑगस्टच्या भाषणासाठी आहे का? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयसीएआरच्या परिपत्रकानुसार 7 जुलैपासून या लसीची चाचणी सुरू होईल. 15 ऑगस्टपर्यंत ही बाजारात येईल

देशात कोरोना रुग्णांच्या संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशात चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान भारत बायोटेकने कोरोनावरील विकसित केलेली लस 15 ऑगस्टपर्यंत तयार होऊ शकते असा दावा आयसीएमआरने केला. यामुळे दिलासा व्यक्त केला जात असतानाच काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत एक गंभीर आरोप केला आहे. पंतप्रधानांच्या 15 ऑगस्टच्या भाषणासाठी या लसीचा दावा केला आहे का? असा सवाल चव्हाण यांनी ट्विटरवरून विचारला आहे. 

काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण 

पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्वीट केले की, 'कोव्हीड-19 साठी लस 15 ऑगस्ट पर्यंत तयार होईल हा #ICMR चा दावा अवास्तव आहे. लॉकडाऊनचा गोंधळ, कोलमडलेली अर्थव्यवस्था, गलवान खोऱ्यातील नामुष्की या पार्श्वभूमीवर मोदींना लाल किल्ल्यावरून एखादी मोठी घोषणा करता यावी यासाठी हा आटापिटा आहे का?' असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. तसेच चव्हाण यांनी याबाबत आरोग्य मंत्र्यांकडे स्पष्टीकरण मागितले आहे. 

काय आहे कोरोना लशीबाबत दावा?

हैदराबादमधील भारत बायोटेक कंपनीने कोरोनावरील ही लस तयार केली आहे. इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्च (आयसीएआर) आणि पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजी यांनी एकत्रिपणे ही लस विकसित केली. या कंपनीच्या लशीच्या ह्युमन ट्रायलला CDSCO कडून परवानगी देखील मिळाली आहे. 

आयसीएआरच्या परिपत्रकानुसार 7 जुलैपासून या लसीचे ह्युमन ट्रायल सुरू होणार आहे. शिवाय 15 ऑगस्टपर्यंत ही लस येईल, असे सांगितले जाते आहे. मात्र आता पृथ्वीराज चव्हाण यांनी या दाव्यावरून गंभीर आरोप केल्याने आयसीएआर आणि आरोग्यमंत्र्यांकडून काही स्पष्टीकरण दिले जाईल का हे पाहावे लागेल. 

0