आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय निरुपम गोंधळले:खेलरत्न पुरस्काराच्या नामांतरावर संजय निरुपम सापडले गोंधळात! मी म्हटलो या निर्णयाचे स्वागत आहे, नंतर कळाले की नेमके काय घडले!

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलल्यानंतर काँग्रेसकडून विरोध

केंद्रातील मोदी सरकारकडून राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे ठेवण्यात आले आहे. यानंतर मोदी सरकारवर विरोधकांकडून टिका केली जात आहे. या निर्णयाची घोषणा करताना मोदी म्हणाले की, हा पुरस्कार आपल्या देशातील लोकांच्या भावनांचा आदर करेल. दरम्यान यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी गोंधळत या निर्णयाचे स्वागत केले.

संजय निरुपम यांनी ट्विट करत ते या निर्णयानंतर गोंधळले होते अशी माहिती दिली. ते म्हणाले की, आत्ताच मला एबीपी न्यूज या वृत्त वाहिनीने एक चुकीची माहिती देऊन माझ्याकडून फोनो घेतला आहे. मला सांगण्यात आले की, मेजर ध्यानचंद यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. मला चुकीची माहिती देऊन माझ्याकडून फोनो घेतला असल्याचे ते म्हणाले.

मी गोंधळलो होतो...
संजय निरुपम म्हणाले की, 'वृत्तवाहिनीने मला माहिती दिल्यानंतर मी म्हणालो की, हे कौतुकास्पद पाऊल आहे. मला सांगण्यात आले होते की, मेजर ध्यानचंद यांना राजीव गांधी पुरस्कार देण्यात आला. पण नंतर मला कळाले की, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद ठेवण्यात आले. हा हलकटपणा आहे. याचा मी तीव्र निषेध करतो.'

दिग्विजय सिंह म्हणाले...
पुरस्काराचे नाव बदलल्यावरुन दिग्विजय सिंह म्हणाले की, 'मला तर असे वाटले होते की ते राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव देखील बदलून नरेंद्र मोदी खेलरत्न पुरस्कार ठोवले जाईल. यालाच इंग्रजीमध्ये Megalomania म्हणतात!' असे दिग्विजय सिंह म्हणाले आहेत. आपण सर्वश्रेष्ठ असल्याची भावना मनात निर्माण होणे, याला मेगलोमॅनिया म्हटले जाते.

1991-92 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराची स्थापना करण्यात आली
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा भारतीय खेळातील सर्वोच्च पुरस्कार आहे. 1991-92 मध्ये सरकारने या पुरस्काराची सुरुवात केली होती. विजेत्या खेळाडूला प्रशस्तीपत्र, पुरस्कार आणि 25 लाख रुपये दिले जातात. पहिला खेल रत्न पुरस्कार प्रथम भारतीय ग्रँड मास्टर विश्वनाथन आनंद यांना देण्यात आला होता. आतापर्यंत 45 लोकांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. अलीकडेच क्रिकेटपटू रोहित शर्मा, पॅरालिम्पियन हाय जम्पर मरिअप्पन थंगावेलू, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, पैलवान विनेश फोगाट यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...