आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

भेटीवरून टीकास्त्र:शिवसेनेच्या कंपाउंडरला हेडलाइन बनवण्याची प्रचंड भूक लागलीये, ही भूक अनेकांना संपवते; काँग्रेस नेते संजय निरुपम यांचा संजय राऊतांवर घणाघात

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फडणवीसांसोबतच्या भेटीचे संजय राऊतांनी दिले होते स्पष्टीकरण

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीवरून राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले होते. मात्र ही भेट फडणवीसांची मुलाखत घेण्यासाठी घेतली होती असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले होते. राऊतांच्या या स्पष्टीकरणावर काँग्रेस नेता संजय निरुपम यांनी टीका केली आहे.

संजय निरुपम यांनी ट्विटरवरून संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या कंपाउंडरला हेडलाइन बनवण्याची प्रचंड भूक लागली असून ही भूख अनेकांना संपवते. ही दुर्भावना नाही तर वास्तव आहे. असा घणाघातच निरुपम यांनी केला आहे.