आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

भाजपवर टीकास्त्र:राज्यात दिलदार मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीसांना सत्ता नसलेलं सहन होत नाही; यशोमती ठाकूर यांची टीका

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो
  • उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यामुळे राज्यातील सरकार स्थिर - यशोमती ठाकूर

राजस्थानातील भाजपच्या ऑपरेशन लोटसमुळे सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे. यावर आता महाराष्ट्रातील नेतेमंडळीही आपली प्रतिक्रिया देत आहेत. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. भाजपला घोडेबाजाराची सवय आहे, त्यांना पैशाचा उन्मात आहे, अशा शब्दात यशोमती ठाकूर यांनी भाजपवर टीका केली आहे.

महाराष्ट्रात राजस्थानसारखी परिस्थिती उद्भवणार नाही

भाजपला घोडेबाजाराची सवय आहे, त्यांना पैशाचा उन्मात आहे.  कर्नाटकात असताना मी हे सर्व अनुभवले होते. हे सर्व राजकीय संस्कृतीच्या विरोधात आहे. मात्र, महाराष्ट्रात राजस्थानसारखी परिस्थिती उद्भवणार नाही, असा आशावाद यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला

फडणवीसांना सत्ता नसलेलं सहन होत नाही

''देवेंद्र फडणवीस आमच्या विदर्भातील आहेत. मात्र, त्यांना सत्ता नसलेलं सहन होत नाही'', अशी टीकाही यशोमती ठाकूर यांनी फडणवीसांवर केली. तसेच, राज्यात दिलदार मुख्यमंत्री आणि शरद पवार, सोनिया गांधी असल्याने राज्यातील सरकार स्थिर असल्याचंही त्या म्हणाल्या.

0