आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील काँग्रेस नेत्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी ही भेट झाली आहे. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती होती. मात्र काँग्रेस नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.
दरम्यान ही भेट राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभा सदस्यपदाच्या जागेसाठी पोटनिवडणुकीसंदर्भात झाली आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रजनी पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर भाजपने देखील या निवडणुकीसाठी उमेदवार उभा करणार असे सांगितले आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेत राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली. या चर्चेनंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'कोअर कमिटीशी चर्चा करुन आम्ही या संदर्भात निर्णय घेऊ.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.