आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभा अध्यक्षपद:नितीन राऊतांच्या गळ्यात मारण्याचा काँग्रेस नेत्यांचा डाव; नाना पटोलेंचा ऊर्जामंत्रिपदावर डोळा; मराठा, ओबीसी नेत्यांचे पाठबळ

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऊर्जा विभागाचा अर्थसंकल्प 7 ते 10 हजार कोटींचा असतो

रिक्त असलेले विधानसभा अध्यक्षपद पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर भरण्यासाठी काँग्रेस पक्षात हालचाली गतिमान झाल्या आहेत. ऊर्जा मंत्रिपदावर डोळा ठेवून विधानसभेचे अध्यक्षपद हे विद्यमान ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या गळ्यात मारण्यासाठी प्रदेश काँग्रेसमधील मराठा व ओबीसी नेत्यांनी नेटाने प्रयत्न चालवला आहे. महाविकास आघाडीत विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसच्या वाट्यास आलेले आहे. मात्र काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी अध्यक्षपदाचा अल्पकालात राजीनामा दिला व ते प्रदेश काँग्रेस अध्यक्ष बनले. नितीन राऊत यांच्याकडे असलेल्या ऊर्जामंत्रिपदासाठी पटोले इच्छुक आहेत. त्यांनी तशी पक्षश्रेष्ठींकडे मागणीसुद्धा केलेली आहे.

ऊर्जामंत्री नितीन राऊत हे विदर्भातील मागासवर्गीय नेते आहेत. त्यांच्या पदोन्नती आरक्षणाच्या आग्रही भूमिकेने काँग्रेसमधील मराठा नेत्यांना ते नकोसे आहेत. नाना पटोले हे विदर्भातील ओबीसी यांनी अध्यक्षपदाचा अल्पकालात राजीनामा दिला व ते प्रदेश काँग्रेस अध्यक्ष बनले. नितीन राऊत यांच्याकडे असलेल्या ऊर्जामंत्रिपदासाठी पटोले इच्छुक आहेत. त्यांनी तशी पक्षश्रेष्ठींकडे मागणीसुद्धा केलेली आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत हे विदर्भातील मागासवर्गीय नेते आहेत. त्यांच्या पदोन्नती आरक्षणाच्या आग्रही भूमिकेने काँग्रेसमधील मराठा नेत्यांना ते नकोसे आहेत. नाना पटोले हे विदर्भातील ओबीसी नेते असून काँग्रेसमधील ओबीसी मंत्र्यांचा त्यांना मोठा पाठिंबा आहे.

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, पशुसंवधर्न मंत्री सुनील केदार हे मंत्रीमंडळातील काँग्रेसचे ओबीसी नेते राऊत यांच्या विरोधात आहेत. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील महसूल मंत्री बाळासाहेब थाेरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे मातब्बर मराठा नेते नितीन राऊतांच्या विरोधात आहेत. परिणामी राऊत यांच्या माथी विधानसभा अध्यक्षपद मारण्यासाठी राज्य काँग्रेसमध्ये जोराचे प्रयत्न सुरु आहेत. पावसाळी अधिवेशन ५ व ६ जुलै असे दोन दिवस आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षाच्या निवडीची शक्यता नाही. मात्र राज्यपाल महोदय यांचा तगादा असल्याने अध्यक्ष निवडीची प्रक्रिया लवकरच करावी लागणार आहे.

ऊर्जा खात्याची ही खरी मेख
ऊर्जा विभागाचा अर्थसंकल्प ७ ते १० हजार कोटींचा असतो. यापूर्वी दहा वर्षे अजित पवार यांनी हा विभाग सांभाळला आहे. विभागाकडे असलेल्या मोठ्या निधीमुळे या विभागासाठी मंत्र्यांत रस्सीखेच असते. नितीन राऊत विदर्भातील काँग्रेसचा मागासवर्गीय चेहरा असून पक्षाच्या अखिल भारतीय अनुसूचित जाती सेलचे अध्यक्षही आहेत. त्यामुळे राऊत यांच्याबाबत पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याची उत्सुकता आहे.

बातम्या आणखी आहेत...